Posts

Showing posts from August, 2021

रिपब्लिकन नेते व पॅथर दिवंगत यशवंत भि.पवार (भाई पवार) यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त पूण्यानूमोदन व अभिवादन सभा संपन्न..

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते *दिवंगत यशवंत भिकाजी पवार(भाई पवार) यांच्या स्मृतीदिनानिमित्त पूण्यानूमोदन व अभिवादन सभा दिनांक 30/8/2021 सकाळी 11.00 वाजता पिकनिक पाँईट यूनीट नं.22 नागलोके बूद्ध विहार आरे मिल्क काॅलनी गोरेगाव पूर्व मुंबई-65 येथे *मा.ना.रामदासजी आठवले साहेब* राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न या प्रसंगी *नामदार रामदासजी आठवले साहेबांनी* *दिवंगत यशवंत भि.पवार उर्फ भाई पवार* यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील व पॅथर ते रिपब्लिकन पक्षाच्या जडणघडणीत त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करून त्यांना आदरांजली वाहिली या प्रसंगी स्विय सहाय्यक *आद.प्रविणजी मोरे,*प्रसिद्धी प्रमूख *आद.हेमंत रणपिसे*,व जिल्हा अध्यक्ष *मा.प्रकाशजी जाधव*,व, *उत्तम ढाले, नितूताई मोरे,रेखाताई मोरे,,लक्कीताई मिश्रा,ज्योतीताई जोगदंड,बालाजी जाधव,गवळणताई जाधव,इब्राहिम शेख,देविदास गायकवाड,मिलन दूबे,अजमेर शेख,विशाल पाईकराव,रोहीत,आव्हाडे,अ

महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण गृह राज्यमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांच्या कडे विकास कामांसाठी निधी मागणी चे पत्र सातारा सर्किट हाऊस येथे देताना.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण गृह राज्यमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांच्या कडे  विकास कामांसाठी निधी मागणी चे पत्र सातारा सर्किट हाऊस येथे देताना, शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार श्री उल्हास दादा पाटील, नरसिंह वाडी चे माजी सरपंच नेते श्री धनाजी दादा जगदाळे सरकार, जयसिंगपूर चे नगरसेवक माननीय श्री पराग दादा पाटील, अर्जुनवाड गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री विकास पाटील, संभाजीपुर चे सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ पाटील उपस्थित होते

संधीची समानता हा आरक्षकणामागील हेत तुकाराम अपराध यांचे मत...

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  इचलकरंजी ता. ३१,आरक्षणाचे समर्थन करणारे किंवा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी केवळ आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण न करता आरक्षणा मागील घटनाकारांची भूमिका समजून घेतली पाहिजे.समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी वंचित आणि शोषित घटकांना संधीची समानता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.समताधिष्ठित समाज निर्माण करणे हा आरक्षणाच्या धोरणाचा मूळ उद्देश आहे.असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्ता व्याख्यानमालेत 'आरक्षण आणि  राजकारण ' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी  प्रा.रमेश लवटे होते. तुकाराम अपराध पुढे म्हणाले,आरक्षण हा समतेचा राजमार्ग आहे.आरक्षण म्हणजे केवळ पोटापाण्याची सोय नव्हे. आरक्षणाच्या लाभार्थ्यांनीसुद्धा आपण समतेच्या यात्रेत सहभागी असल्याचे योग्य भान ठेवायला हवे. त्यासाठीची जबाबदारी उचलायला सर्वांनीच सज्ज राहायला हवे. प्रत्येकाने संविधानाच्या नैतिक अधिष्ठानावर ठाम उभा राहायला हवे.यावेळी अपराध  यांनी स्वातंत्रपूर्व कालखंडातील तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातील आरक्षणाचा इतिहास

यळगुड ग्रामपंचायतीचे स्वच्छताकडे दुर्लक्ष

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  प्रहार संघटनेचे यळगुड ग्रामपंचायतीला स्वच्छता करण्याबाबत निवेदन देण्यात आले.  घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष   यळगुड ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छतेचा व आरोग्य विषयक बाबतीत होत असलेले दुर्लक्ष यामुळे वेळेत गटारी न स्वच्छ केल्या कारणाने गटारी तुंबत असून यामुळें वेग वेगळ्या आजाराना सामोरे जावे लागत आहे . ग्रामपंचायत व परीसरात स्वच्छता काळजीपूर्वक  होत नसलेमुळे येथील नागरीकांना नेहमी तुंबलेल्या गटारी यामुळे डेंगू डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असून या परिसरात असंख्य रूग्ण आढळत आहेत.  ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहीरात बाजी करण्यापेक्षा या परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नियोजन करून त्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष नागरीकांच्यासह एक मोठे उग्र जनआंदोलन करेल व यामधुन होणा - या नुकसानीस प्रशासन व ग्रामपंचायत जबाबदार राहील . या पत्राची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकणंगले तालुका सचिव  वैभव झुंजार यांनी केले यावेळीं यळगुड शहर प्रमुख

सैनिक टाकळी येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  सैनिक टाकळी (प्रतिनिधी) इसविसन १९१४ ते २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंब महाराष्ट्रातील वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले असून त्यांचा नुकताच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑ. ले. बी. एस. पाटील होते. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील टाकळी या गावातील घरटी एक तरी व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या गावाला ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.  इसविसन १९६८ साली देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सहकार्याने भारताचे लष्करप्रमुख जनरल पी. पी. कुमार मंगलम, जनरल एस. पी. थोरात आणि ले. जनरल मोती सागर टाकळी गावात आले होते. त्यावेळी गावच्या आजी-माजी सैनिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. फौजी गणवेश परिधान करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिलेले जवान पाहताना लष्करप्रमुख भारावून गेले. टाकळी गावची महती त्यांनी स्वतः जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी 'इस गाव का नाम सिर्फ टाकळी नही, सैनिक

ब्रेकिंग न्युज : वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्डमध्ये डॉ. तुषार निकाळजे यांची नोंद

Image
  हुपरी समाचार वृत्तसेवा :     पुणे :   डॉ. तुषार निकाळजे यांचे  "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी "हे  पुस्तक प्रकाशित झाले आहे .हे पुस्तक ब्रेल- इंग्रजी ,हिंदी ,उर्दू, इंग्रजी ,मराठी या पाच भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.  विद्यापीठांच्या निरनिराळ्या विभागांच्या कामकाजाची माहिती देणारे हे पुस्तक आहे. या शैक्षणिक पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. डॉ. तुषार निकाळजे यांना शैक्षणिक क्षेत्रात "ट्रेंड सेटर" म्हणून ओळखले जाते.                                                 ब्रेल -इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक ब्लाइंड मेन्स असोसिएशन, पुणे आहेत. मराठी पुस्तकाचे प्रकाशक हरिती पब्लिकेशन ,पुणे आहे. इंग्रजी- हिंदी -उर्दू या एकत्रित भाषांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रेस मीडिया (महाराष्ट्र व कर्नाटक) आहेत. डॉ.तुषार निकाळजे यांना वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्र, पदक व पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथे शाहुसंस्कृतीक हॉल मध्ये कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीची आढावा बैठक पार पडली

Image
हुपरी समाचार वृत्तसेवा :   कोल्हापूर : आज कोल्हापूर येथे शाहुसंस्कृतीक हॉल मध्ये कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीची आढावा बैठक पार पडली    हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी पार्टीला ताकत द्या मुश्रीफ साहेब तालुक्यातील जुन्यानव्या कार्यकर्त्यांची भक्कम मोठं बांधून एक हाती राष्ट्रवादीची सत्ता आणू असा शब्द राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजीव आवळे साहेब यांनी दिला . या वेळी जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री ना हसन मुश्रीफ साहेब म्हणाले राष्ट्रवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर सत्ता आणण्यासाठी संघटितपणे कामाला लागा मी कार्यकर्त्यांना लागेल ती ताकत देऊ असे आश्वासन दिले.      यावेळी आमदार राजेश पाटील,माजी आमदार केपी पाटील साहेब,माजी आमदार श्रीमती कुपेकर काकी,आर के पवार,जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील,कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, नावेद मुश्रीफ,राजू लाटकर,आदिल फरास,जिल्ह्यातील पार्टीचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक जीप सदस्य पस सदस्य सर्व संस्थांचे संचालक महिला आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीव्ही सेलिब्रिटी करण ग्रोवर व अभिनेता आणि कोरिओग्राफर हनीफ हिलाल यांच्या उपस्थितीत 'स्टुडिओ वर्क्स' चा उद्घाटन सोहळा संपन्न

Image
हुपरी समाचार वृत्तसेवा :  डान्स प्रशिक्षण आणि म्युझिकच्या विविध सेवा पुणेकरांना मिळणार एकाच छताखाली पुणे : म्युझिक स्टुडिओ, डान्स स्टुडिओ, कॅरि ओके सेटअप आणि म्युझिक क्लासेस आता पुणेकरांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. डान्स आणि म्युझिक उपक्रमांसाठी सर्व सोईयुक्त वन स्टॉप डेस्टीनेशन असलेल्या स्टुडिओ वर्क्स'चे उद्घाटन आज करण्यात आले. टीव्ही सेलिब्रिटी करण ग्रोवर व अभिनेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर हनीफ हिलाल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी 'स्टुडिओ वर्क्स' ला जहांगीर दोराबजी, विशाल आरोरा, अनिल काकडे, नरेंद्र चव्हाण, महेश मिश्रा आदी उपस्थित होते. 'स्टुडिओ वर्क्स'ची पहिली शाखा एन आय बी एम रोड येथील रॉयल हेरीटेज मॉल येथे सुरू झाली आहे. यावेळी बोलताना 'स्टुडिओ वर्क्स'चे विशाल आरोरा म्हणाले, संगीत हे एका औषधा प्रमाणे असते, असे बोलले जाते. करोनाच्या काळात तर हे शब्दशः खरे ठरले आहे. हीच गोष्ट लक्षात ठेऊन आम्ही 'स्टुडिओ वर्स' सुरू केला आहे. हे एक 'वन स्टॉप डेस्टीनेशन' असणार आहे. 'स्टुडिओ वर्क्स' बद्दल माहिती देताना विशाल आरोरा म्हण

शिवसेनेला राजकारण करताना करोना आडवा येत नाही , माञ सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का?

Image
हुपरी समाचार वृत्तसेवा :  मुंबई :  करोनामुळे दहीहंडीवर राज्य सरकारकडून याही वर्षी निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र असे असले तरीही मनसेने हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेला राजकारण करताना करोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे. जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं. काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही. असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा प्रश्न जाधव यांन

आपले आरोग्य : रक्तातील साखर राखण्यासाठी निरोगी आहार घेणे फार महत्वाचे..

Image
मुंबई :  जर तुम्ही टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्हाला  चांगलेच माहीत  आहे की रक्तातील साखर राखण्यासाठी निरोगी आहार घेणे फार महत्वाचे आहे. निरोगी आहारामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तुमचे वजन नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णांनी स्टार्च आणि साखरेचे सेवन टाळावे. परंतु अनेक वेळा गैरसमजांमुळे लोक पौष्टिक आहाराचे सेवन करत नाहीत.  कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असाल तर पौष्टिक आहार घेणे फार महत्वाचे आहे. निरोगी आहार घेतल्याने मधुमेहाची लक्षणे कमी होऊ शकतात. आपल्या प्लेटमध्ये निरोगी चरबी आणि फायबर असणे आवश्यक आहे. ते तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात. तसेच, अस्वस्थ गोष्टी खाणे टाळा. मधुमेहाच्या रुग्णाने कोणत्या गोष्टींचे सेवन करावे ते जाणून घेऊया. हे पदार्थ खावेत फळे - सफरचंद, संत्री, बेरी, पेरू, टरबूज आणि नाशपाती भाज्या - ब्रोकोली, फुलकोबी, काकडी, पालक धान्ये - ओट्स, तपकिरी तांदूळ आणि बाजरी कडधान्य - बीन्स आणि मसूर सुकामेवा - बदाम, अक्रोड, पिस्ता बियाणे - चिया बियाणे, भोपळा बियाणे आ

जिल्ह्यातील ७८ पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा ३ सप्टेंबर शुक्रवारी विविध परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजता घेण्यात येणार .

Image
हुपरी समाचार वृत्तसेवा :    कोल्हापूर -  जिल्ह्यातील ७८ पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा ३ सप्टेंबर शुक्रवारी विविध परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रवेशिका ( हॉल तिकीट) हे ई मेलवर व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबत अडचण असल्यास उमेदवारांनी पोलिस दलाने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकाची मदत घ्यावी असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले आहे. जिल्हा पोलिस दलातील ७८ शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांसाठी २०१९ मध्ये १५ हजार ७६७ अर्ज दाखल झाले होते. यातील शिपाई पदासाठी ९ हजार ५५० तर बँन्ड पथकातील तीन जागांसाठी ६ हजार २१७ अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेत बदल झाले असून पहिल्यांदा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांची नंतर शारीरिक परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा ३ सप्टेंबरला सकाळी १० ते ११.३० या वेळेत विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. उमेदवारांना प्रवेशिका (Halll Ticket) त्यांच्या ई मेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ही प्रवेशिका https://mahapolicerc.mahait

महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजले

Image
महानगरपालिका निवडणुकांना अवकाश असला तरी आतापासूनच राजकीय पक्षांना त्यांचे वेध लागले असणार यात शंका नाही. महानगरपालिका निवडणुकीत 'एक प्रभाग एक सदस्य' अशी रचना असल्याचे जाहीर झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह अनेक महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजले आहेत, असेच म्हटले पाहिजे. पुढील वर्षीच्या सुरुवातीस या निवडणुका होणार असल्या तरी राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करतील यात शंका नाही.2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे आणि शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असल्याचे दावे भाजपकडून केले जाऊनही सरकारच्या स्थैर्यावर परिणाम झालेला नाही. याचा अर्थ या तीन पक्षांत धुसफूस नाही असा नाही. पण बहुधा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे या एकाच उद्देशाने त्यांना एकत्र ठेवले असावे. वास्तविक विधानसभा निवडणुकीत हे तीन पक्ष एकत्र लढले नव्हते. मध्यंतरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळाला होता हे खरे; पण जनमताचा कौल म्हणून त्या निकालाकडे पाहणे संयुक्‍तिक नाही. त्यामु

रोज १० लाख रुपये वसुलीचे टार्गेट देणारा पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण ?. संजय मोरे.

Image
हुपरी समाचार वृत्तसेवा :  पुणे - कोरोना ही आपत्ती नाही तर ' मिळालेली कमाईची सुवर्णसंधी 'मानून अतिक्रमण प्रमुख माधव जगतापांच्या करवी रोज १० लाख रुपये वसुलीचे टार्गेट देणारा पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण ? या संदर्पुभात संजय मोरे यांनी म्हटले आहे कि,' महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील सहआयुक्तांना प्रतिदिन दहा लाख रुपये दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट दिल्याचे आदेश देण्यात आले होते हे स्पष्ट झाले आहे.. कोरोना महामारीच्या अनुषंगाने मास्क न घालणे,सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. कोरोना महामारी प्रसार कमी होण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे योग्य असली तरी प्रतिदिन दहा लाख रुपये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून जमा करण्याचे उद्दिष्ट देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे हे एक प्रकारचे तालिबानी फर्मान म्हणावे लागेल, आणि या अधिकाऱ्याला तालिबानी फर्मान काढण्यास लावणारा म्होरक्या नक्की आहे तरी कोण ?  हे पुणेकर जनतेला समजणे महत्वाचे आहे. प्रतिदिन दहा लाख रुपये दंडाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून

मंदिरे सुरू करा नाही तर जेलभरो आंदोलन करू ... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

Image
हुपरी समाचार वृत्तसेवा :    राळेगणसिद्धी :  मंदिरे सुरू करा नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे  यांनी दिला होता. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी आदिती यांनी अण्णांना कोरोनाची परिस्थितीही समजावून सांगितली. मात्र, अण्णांनी आंदोलन मागे घेण्याबाबतचं कोणतंही ठोस आश्वासन आदिती तटकरे यांना दिलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे अण्णाचं आंदोलन होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज भेट घेतली. अर्धा तास आदिती तटकरे यांनी अण्णांसोबत चर्चा केली. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे देखील उपस्थित होते. आमदार झाल्यापासून अण्णांची भेट घ्यायची होती. मात्र कोरोनामुळे ते शक्य झालें नव्हते. त्यामुळे अहमदनगरमध्ये आल्यावर अण्णांची सदिच्छा भेट घेतल्याचे तटकरे यांनी सांगितले. अण्णांना भेटून प्रेरणा मिळाली अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करून विव

इचलकंरजी येथील तीस लाभार्थ्याचे रमाई आवास योजनेतुन घराचे स्वप्न हाेणार साकार.

Image
    हुपरी समाचार वृत्तसेवा :  इच लकरंजी : मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्याना घर बांधणीसाठी रमाई आवास योजना राबवली जाते या योजनेतुन इचलकंरजी येथील तीस पात्र लाभार्थ्याना घर बांधकामाचा निधी लवकरच मिळणार आहे अर्थ मंत्रालयातुन त्याबाबतच्या प्रस्तावाला अंतरिम मंजुरी मिळाली आहे यासाठी मा. उपनगराध्यक्ष रवि रजपूते यानी पाठपुरावा केला आहे या तीस घराच्या बांधकामसाठी सुमारे 75लाख रुपयांचा निधी प्राप्त हाेणार आहे कोल्हापुर जिल्हातील 221 प्रस्ताव मंजुर असुन त्यापैकी ग्रामीण भागातील घराच्या बांधकामाचा निधी आला आहे. तर शहरी भागातील पात्र लाभार्थ्याच्या निधीचा प्रश्न राज्य शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडे प्रलबित होता. याबाबत रवि रजपूते यानी कॉग्रेसचे नगरसेेवक मा. राहुल खंजीरे याना सोबत घेऊन पालकमंत्री मा. सतेज पाटील याच्याशी संपर्क साधुन वस्तुस्थिति कथन केली.  त्यावर मा. पालकमंत्री पाटील यानी अर्थ मंत्रालय आणि सामाजिक न्यायमंत्री मा. धनंजय मुंडे याच्याशी संपर्क साधुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. याच कामातील पहिला टप्पा म्हनुन 26अॉगस्ट रोजी वित्त मंत्रालयाकडुन 20कोटीचा शासन (G.R.)जारी करण्यात आ