कोल्हापूर येथे शाहुसंस्कृतीक हॉल मध्ये कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीची आढावा बैठक पार पडली


हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कोल्हापूर : आज कोल्हापूर येथे शाहुसंस्कृतीक हॉल मध्ये कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीची आढावा बैठक पार पडली

   हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी पार्टीला ताकत द्या मुश्रीफ साहेब तालुक्यातील जुन्यानव्या कार्यकर्त्यांची भक्कम मोठं बांधून एक हाती राष्ट्रवादीची सत्ता आणू असा शब्द राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजीव आवळे साहेब यांनी दिला . या वेळी जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री ना हसन मुश्रीफ साहेब म्हणाले राष्ट्रवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर सत्ता आणण्यासाठी संघटितपणे कामाला लागा मी कार्यकर्त्यांना लागेल ती ताकत देऊ असे आश्वासन दिले.

     यावेळी आमदार राजेश पाटील,माजी आमदार केपी पाटील साहेब,माजी आमदार श्रीमती कुपेकर काकी,आर के पवार,जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील,कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, नावेद मुश्रीफ,राजू लाटकर,आदिल फरास,जिल्ह्यातील पार्टीचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक जीप सदस्य पस सदस्य सर्व संस्थांचे संचालक महिला आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post