जिल्ह्यातील ७८ पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा ३ सप्टेंबर शुक्रवारी विविध परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजता घेण्यात येणार .हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कोल्हापूर - जिल्ह्यातील ७८ पोलिस शिपाई भरतीसाठीची लेखी परीक्षा ३ सप्टेंबर शुक्रवारी विविध परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रवेशिका ( हॉल तिकीट) हे ई मेलवर व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.याबाबत अडचण असल्यास उमेदवारांनी पोलिस दलाने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकाची मदत घ्यावी असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले आहे.

जिल्हा पोलिस दलातील ७८ शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांसाठी २०१९ मध्ये १५ हजार ७६७ अर्ज दाखल झाले होते. यातील शिपाई पदासाठी ९ हजार ५५० तर बँन्ड पथकातील तीन जागांसाठी ६ हजार २१७ अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेत बदल झाले असून पहिल्यांदा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांची नंतर शारीरिक परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा ३ सप्टेंबरला सकाळी १० ते ११.३० या वेळेत विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. उमेदवारांना प्रवेशिका (Halll Ticket) त्यांच्या ई मेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ही प्रवेशिका https://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरून देखील डाऊनलोड करता येईल.

उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता ओळखपत्रावर नमुद असलेल्या परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांना ओळखपत्र, प्रवेशिका प्राप्त करण्यात काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी उपलब्ध करून दिलेल्यामोबाईल क्रमांकावर अगर फोन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहान काकडे यांनी केले आहे.मदतीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक -९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ९३०९८६८२७० यावर संपर्क करावा

Post a Comment

Previous Post Next Post