दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
प्रहार संघटनेचे यळगुड ग्रामपंचायतीला स्वच्छता करण्याबाबत निवेदन देण्यात आले. घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष
यळगुड ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छतेचा व आरोग्य विषयक बाबतीत होत असलेले दुर्लक्ष यामुळे वेळेत गटारी न स्वच्छ केल्या कारणाने गटारी तुंबत असून यामुळें वेग वेगळ्या आजाराना सामोरे जावे लागत आहे . ग्रामपंचायत व परीसरात स्वच्छता काळजीपूर्वक होत नसलेमुळे येथील नागरीकांना नेहमी तुंबलेल्या गटारी यामुळे डेंगू डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असून या परिसरात असंख्य रूग्ण आढळत आहेत.
ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहीरात बाजी करण्यापेक्षा या परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नियोजन करून त्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष नागरीकांच्यासह एक मोठे उग्र जनआंदोलन करेल व यामधुन होणा - या नुकसानीस प्रशासन व ग्रामपंचायत जबाबदार राहील . या पत्राची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकणंगले तालुका सचिव वैभव झुंजार यांनी केले यावेळीं यळगुड शहर प्रमुख शितल कुर्ले, सुकुमार नाकील साहेब,हुपरी शहर प्रमुख अनिल गावडे,राजू मांगूरकर साहेब,शाहाबुद्दीन घुडूभाई साहेब इत्यादी उपस्थित होते