Posts

Showing posts from September, 2021

राजकीय द्वेषापोटी आता राज्य सरकारवर कारवाई केली जाते,...कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी आणि विरोधकांवर दबाव निर्माण करण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. परमवीर सिंग हे त्यावेळी मुंबई पोलीस कमिशनर होते. त्यांना त्या काळातच कारवाई झाली असती तर हा जो घोटाळा बोलला जातोय त्याचा मूळ उद्देश काय आहे तो समोर आला असता. मात्र राजकीय द्वेषापोटी आता राज्य सरकारवर कारवाई केली जाते, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी कॉंग्रेसला फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजप-मनसेच्या संभाव्य युतीवर टीका केली. राज्यात भाजप-मनसे संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप संसार थाटण्याची शक्‍यता आहे. पालघरमध्ये मनसे भाजप युतीचा नारळही फुटला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ही काहीशी खोचक कमेंट केली. तसेच देशातील विविध राज्यात शिवसेना निवडणूक लढवत आहेत. शिवसेना हा आमचा महाराष्ट्रात मित

पंचनाम्याच्या कामामध्ये ग्रामसेवक राजाराम परीट यांनी केला मोठ्या प्रमाणात घोळ , संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या दालनास कुलूप लावून त्यांना दोन तास कार्यालयातच डांबून ठेवले.

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  कोल्हापूर :  येथे दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे चुकीचे पंचनामे केले, अनेक नुकसानग्रस्तांना वंचित ठेवून नुकसानग्रस्तांची चुकीची यादी बनवली तसेच झालेल्या नुकसानीपेक्षा कमी रक्कमेचे नुकसान दाखवून पंचनाम्याच्या कामामध्ये ग्रामसेवक राजाराम परीट यांनी मोठ्या प्रमाणात घोळ घातल्याने त्यांना निलंबित करावे अशी मागणी करत येथील सर्व व्यापाऱ्यांनी काल (बुधवार) ग्रामपंचायत वर धडक मोर्चा काढला व ग्रामसेवकांना धारेवर धरले. तब्बल तीन तासाच्या गोंधळानंतर संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या दालनास कुलूप लावून त्यांना दोन तास कार्यालयातच डांबून ठेवले. सदर पंचनाम्यात ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या मूल्यमापनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान केले आहे. पंचनामा करतेवेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही तसेच शासकीय नियमांची चुकीची माहिती सांगून त्यांनी व्यापा-यांची दिशाभूल केली. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान होऊन देखील अनेक व्यापाऱ्यांच्या खात्यामध्ये किरकोळ रक्कम जमा होणार असेल तर या सगळ्या चुकीच्या प्रकाराल

परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा ..राज ठाकरे .

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  मुंबई  : कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता 'गुलाब' चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे.  याच पार्श्वभूमीवर  मनसे    अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं 'महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.' 'अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत रहातील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला ५०,००० रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासन

महिला उन्नती संघ नवी दिल्ली च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रवक्ता श्रीदेवी पाटील यांचा सन्मान

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : महिला उन्नती संघ भारत या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांचा महिलांचा व सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला.. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त रजनी गोयल समाज कल्याण अधिकारी शैलेंद्र बहादुर सिंह संस्थेचे मुख्य समूह संरक्षक व ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र बच्चन ग्रेटर नोएडा पत्रकार असोसिएट अध्यक्ष धर्मेंद्र चंदेल संरक्षक इंदू गोयल संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राहुल वर्मा महासचिव अनिल जी भाटी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला  यावेळी गौतम बुद्ध जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले त्यामध्ये विशेष करून महिलावर होणारे अत्याचार उत्पीडन बलात्कार घरेलू हिंसा इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली महिला उन्नती संघाच्या नवनियुक्त महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्रीदेवी पाटील यांचा समाज कल्याण अधिकारी शैलेंद्र बहादूर स

भाजप उमेदवाराच्या फलकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोपेक्षा भाजप नेत्यांचे फोटो मोठे असल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली ,भाजपने तात्काळ या नाराजीची दखल घेत थेट हे फलकच बदलून टाकले.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  वाडा:  वाडा तालुक्यात  जिल्हापरिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, पालसई जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. भाजप उमेदवाराच्या फलकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोपेक्षा भाजप नेत्यांचे फोटो मोठे असल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपने तात्काळ या नाराजीची दखल घेत थेट हे फलकच बदलून टाकले. पालसई जिल्हा परिषद गटातून धनश्री चौधरी या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. त्या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी महिला ब बालकल्याण सभापती होत्या. त्यांच्या फलकावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या छबीचा आकार भाजप नेत्याच्या छबीपेक्षा लहान ठेवण्यात आला होता. त्यामुळे आज दिवसभर भाजप व मनसे कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगलेला पाहायला मिळाला. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांची नाराजी वाढू नये म्हणून भाजपने ताडीने फलक बदलून राज ठाकरे यांची छबी मोठी असलेले फलक लावले. त्यामुळे भाजप मनसे कार्यकर्त्यांमध्ये मान अपमानाचा वाद शमल्याचे बोले जात आहे. मात्र कोणत्याही राजकी

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का ? जयंत पाटील

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर येथे आले असता जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी हा सवाल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत त्यांचं काय झालं हे एकदा ईडीने जनतेला सांगावे असेही जयंत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमिनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी क

खड्डय़ांचा विषय अत्यंत गंभीर....तीन आठवडय़ांत सविस्तर भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे राज्यसरकारला आदेश.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   खड्डय़ांसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी मध्यवर्ती तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी आदेश देऊनही त्याची पूर्तता करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. राज्यातील खड्डय़ांचा विषय अत्यंत गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे बजावत न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने याप्रकरणी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना तीन आठवडय़ांत सविस्तर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. निकृष्ट रस्ते व रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत नागरिकांना तक्रारी नोंदवता याव्यात म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने विविध आदेश दिले होते. 12 एप्रिल 2018 च्या आदेशानुसार तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे, मॅनहोल बंदिस्त करणे, रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यास काम पूर्ण होण्याचा कालावधी त्याबाबत माहिती फलक लावणे आदी सूचनांचे पालन करणे शासन तसेच पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक होते; परंतु राज्य सरकारने याची कोणतीही पूर्तता

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला शब्द खरा करत सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : काेल्हापूर : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला शब्द खरा करत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात सुमारे १०० कोटी रुपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबची कोर्टाने काढलेले नोटीस मात्र सोमय्यांनी स्वीकारली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले माजी खासदार सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुश्रीफ यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत सोमय्यांचे आरोप चुकीचे असून त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज कोल्हापूरच्या न्यायालयात मुश्रीफांनी शंभर कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, आम्हीच पुरविलेले कागदपत्रे घेऊन आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, असे देखील दाव्यात नमूद करण्यात आले आहे. हा सर्व खटाटाेप आम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टीने सुरू आहे. आमचे च

कर्मवीरांची विचारधारा घेऊन शिक्षण क्षेत्राची मांडणी करावी लागेल..प्रसाद माधव कुलकर्णी

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   हुपरी ता.२८ कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयतमाऊली लक्ष्मीबाई यांनी तन,मन,धन अर्पून रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. 'सारे अनर्थ एका विद्येने केले ' या महात्मा फुल्यांच्या अखंडाची प्रेरणा घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशीलता या दाम्पत्याने अखंडपणे जपली. अडी - अडचणी सोसत,आव्हानांना पेलत ध्येयपथावर सक्रिय वाटचाल करीत राहिले तरच परिवर्तन होऊ शकते असा जीवनसंदेश त्यांनी दिला.आज शिक्षण क्षेत्रावर आलेले विषमतेचे अरिष्ट थोपवायचे असेल तर कर्मवीरांची विचारधारा घेऊन शिक्षण क्षेत्राची मांडणी करावी लागेल असे मत समाजवादी प्रबिधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते हुपरी येथील रयत शिक्षण संस्था संकुलाच्या पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा. सरोजताई पाटील उर्फ माई होत्या.प्राचार्या डॉ.पी.बी.पाटील, प्राचार्य बी. आर.भिसे, मुख्याध्यापिका यू.एस.नकाते यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्राबाई -शांताप्पा शेंडूरे कॉलेज, शा

तारदाळ मध्ये पाणी पूरवठा बंद....

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : इचलकंरजी प्रतिनिधी :   तारदाळ ता. हातकणंगले येथे भारत निर्माण नळ पाणी पूरवठा संयुक्त तारदाळ खाेतवाडी या योजनेच्या माध्यामातुन तारदाळ,खाेतवाडीसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे परंतु जुलै व ऑगस्ट मध्ये मुसळदार पाऊस झाल्यामुळे वारणा नदीस महापुर आल्याने महापुरामध्ये दानाेळी येथील जकवेल पुर्णपने बुडालेले हाेते त्यामुळे तेथील सर्व उपकरणे पाण्यात बुडाल्याने सदर ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महिना लाेकांना पाणी देता आले नाही त्यामुळे लाेकाची गैरसाेय झाली तसेच लाॉकडाऊन मुळे अनेक उधाेग धंदे बंद हाेते त्यामुळे अनेक लाेकांना काम नव्हते. म्हणून तारदाळ खाेतवाडी दाेन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने मासिक सभेत ठराव करुन एक महिन्याची पाणी पट्टी माफ करण्याचे ठरले हाेते . परंतु आठ दिवस हाेण्याअगाेदरच भारत निर्माणच्या थकीत वीजबीलामुळे विधुत महावितरण कंपनी कडुन  लाईट कनेक्शन बंद केल्यामुळे महिला वर्गातुन, व नळ कनेकशन धारका कडुन संताप व्यक्त केला जात आहे तसेच पाण्यासाठी महिला वर्गाला वनवण फिरावे लागत आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन लाखाे रुपये खर्च

जयसिंगपूर शहर मनसेच्या वतीने न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  मनसे जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिसे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भटक्या व  मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना व लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत,तसेच पहाटे व सायंकाळी फिरायला जाणारे जेष्ठ नागरिक, महिला व अंगणात खेळणारे लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे,मात्र या बाबींकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून  या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा असे निवेदन जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी यांना देण्यात आले.  येत्या चार दिवसात यावर अमलबजावणी न झाल्यास ही कुत्री कुठलीही पूर्व सूचना न देता पालिका प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दालनात आणून सोडून मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देऊन माहितीसाठी प्रत म्हणून मा.नगराध्यक्षा,मा.उपनगराध्यक्ष, पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले.          यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे,जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष सचिन चकोते,उपाध्यक्ष अमित पाटील,उपाध्यक्ष राजेश कर्णाळे,माजी तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,सहकार सेनेचे शहराध्यक्ष

ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स कंपनीला मनसेचा जाब

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :        ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स ही कंपनी महिलांना कर्ज पुरवते, पण या मायक्रो फायनान्स कंपनीने आता सावकारी पध्दतीने कर्ज वसूल करत आहे, कर्जदार कोरोना पॉझिटिव्ह असून देखील त्या कर्जदारास पैसे भरा असा तगादा या ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला, ही तक्रार मनसेकडे  येताच या कंपनीला चांगलेच धारेवर धरले.  अशी जर सावकारी पध्दतीने व दमदाटीने  कर्ज वसूल केले तर ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स मनसे स्टाईलने फोडणार असे मनसेचे पदाधिकारी मनसे शहर सचिव  महेश शेंडे,वाहतुक सेना तालुका अध्यक्ष  अनिल झाडबुके, उपशहर अध्यक्ष  योगेश दाभोळकर, प्रमोद भाटले, कृष्णा कोपार्डे, अतूल मोहिते, मिनाज बागवान असा इशारा दिला*

भारद बंदला पाठिंबा म्हणून सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले..

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सांगली : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारद बंदला पाठिंबा म्हणून सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात आज धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी आणि केंद्रीय श्रम संहीता कायदा मंजुर केला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला एक वर्ष पुर्ण झाले, परंतु अजुनही सरकारने शेतकरी नेत्यांच्याबरोबर चर्चा करुन मार्ग काढण्याची भूमिका घेतलेली नाही. म्हणुन संय़ुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आंदोलन झाले. आदोलनात उमेश देशमुख, महेश खराडे, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, डॉ. माधुरी देशमुख, जानार्धन गोधळी, तुळशीराम गळवे, रेहाना शेख, शोभा कोल्हे आदी सहभागी झाले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आम आदमी पक्षाचे राजकुमार राठोड, आशपाक शेख यांनी आंदोलनात सहभागी होउन पाठिंबा दिला. सेवा दलाचे सदाशिव मगदुम आणी त्यांच्या टीमने क्रांतीगिते गायली.

राजकिय : बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आहे . आपण तिथे जिंकू शकतो....संजय राऊत

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : पुणे : बारामती म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही दोन नावे आलीच. हा भाग राजकीय दृष्टीकोनातून पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला भेदणं म्हणजे मोठं जिकिरीचं काम असल्याचं म्हटलं जातं. पण हाच गड जिंकण्यासाठी तयारीला लागण्याची संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आहे . आपण तिथे जिंकू शकतो. आपण सकारात्मक राहायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना शिवसेना तसेच पक्षविस्ताराबद्दल सविस्तर भाष्य केलं. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे असंदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. बारामती आपली नाही, असं तुम्ही का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. बारामती महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही. पण संघटनेची ताकद वाढायला हवी. कधी वाटलं होतं का आपण पुरंदरला जिंकू ? हासुद्धा बारामतीचाच भाग आहे. आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो ही सका

कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केले ,तब्बल 21 लाख रूपये किमतींचा गुटखासाठा हस्तगत

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केलेली आहे. तब्बल 21 लाख रूपये किमतींचा गुटखासाठा हस्तगत  आला आहे. जमीर अरूण पटेल (वय-45, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उचगावजवळ (ता. करवीर) वाहन पकडून त्यातून तब्बल 21 लाख रुपये किमतीचा गुटखासाठा हस्तगत करण्यात आला. जमीर अरुण पटेल याला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकातून गुटखा व अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा होती. कर्नाटकातील संकेश्वर, निपाणी परिसरातून पुणे बंगळूर मार्गावरून पान मसाला व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली. या माहितीनूसार सकाळी पुणे- बंगळूर मार्गावर सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, वाहनाचा पाटलाग करत उचगावजवळ या वाहनास अडवण्यात आले. वाहनामध्ये 21 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या कारवाईमध्ये आकाश पाटी

खुरपे ट्रेडर्स मजरेवाडी यांचा असाही विश्वास संपादन....... दुकानात विसरून गेलेले सोने व रोखड रक्कम दिले परत

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मजरेवाडी...  तालुका शिरोळ :       अल्पावधीतच आपल्या दुकानात  गुणात्मक दर्जेदार व माफक दरात वस्तू उपलब्ध करून ग्राहक हेच आमचे दैवत मानून पंचक्रोशीत नाव कमावलेले वर्धमान व बंडू उर्फ प्रदिप खुरपे या भावंडांचे खुरपे ट्रेडर्स मजरेवाडी या नावाने प्रसिद्धीस आले आहे..        नेहमी प्रमाणे एक जोडपे दुकानात आले व त्यांना हवे ते माल खरेदी करून त्याचे बील ही रोखीने दिले.व आलेल्या कारने आपल्या गावी पोहोचले...   गावी पोहोचले नंतर त्या जोडप्याच्या लक्षात आलं की आपण आपले पर्स खुरपे ट्रेडर्स येथे विसरलोय.लागलीच त्यांनी खुरपे ना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा नंबर नसल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगितले की, आम्ही गडबडीत दुकानात पर्स विसरून आलो आहे.तिथ दुकानात जाऊन पर्स आहे का? चौकशी करून फोन करण्यास सांगितले.त्याप्रमाणे त्या  इसमाचे आई खुरपे ट्रेडर्स येथे आल्यावर त्यांनी विसरून राहीलेले पर्स आहे का चौकशी केली.दुकानदारानी पर्स असलेची सांगितले त्यावर त्या आई हिरमुसल्या व मुलाला फोन करून  पर्स असलेची सांगितले......त्यावर थोड्या वेळाने ते जोडपे आपल्

सांगली : बंटी-बबली जोडीने सहा जणांना 52 लाख 90 हजाराचा गंडा घातलाय

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   सांगली :  कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे असे सांगत सांगली मध्ये सहा जणांना एका दांपत्याने 52 लाख 90 हजाराचा गंडा घातलाय. 10 हजाराने कमी दरात सोने मिळेल असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे असं या जोडीचं नाव आहे. सांगली शहर पोलीस स्टेशन मध्ये कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सध्या हे कोकणे दांपत्य फरार असून त्याचा मोबाईल देखील बंद आहे. मोबाईल बंद ठेवत संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्या लोकांनी कोकणे दाम्पत्याकडे पैसे गुंतवले होते त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. लाखोंने पैसे गुंतवलेल्या सात जणांनी कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. झटपट नफ्याचे आमिष आणि लाखोंची गुंतवणूक याप्रकरणातील फिर्यादी भास्कर मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे याच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा मिळवण्यासाठी माझ्याकडे एक स्कीम असल्याचे त्यांना सांगितले. यात 10 हजार इतक्या कमी दराने सोनं मि

भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे समोर आल्याने आमदार कांबळे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. त्यातच आता भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे समोर आल्याने आमदार कांबळे  यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर संबंधित महिला अधिकारी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडील कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी या कामासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांची परवानगीची आवश्यकता आहे असे संबंधित महिला अधिकाऱ्याने सांगितले. त्यावरून चिडून कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे महिला अधिका

फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय ...राज ठाकरे

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   नाशिक - फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका करत राज ठाकरे यांनी प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा उद्देश काय हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, असा सवाल केला आहे. 2012 मध्ये कॉंग्रेस आणि राष्टवादी कॉंग्रेसचे सरकार असताना एक उमेदवार होता, त्यानंतर त्यांनी एक प्रभाग पद्धत सुरु केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं जेव्हा सरकार आलं तेव्हा त्यांनी चार प्रभाग पद्धत सुरु केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पुन्हा एक प्रभाग पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार निवडणुकी आयोगाने राज्य सरकारला कळवलं एक उमेदवारचं उभा करायचा. आता परत काल महाविकास आघाडी सरकारने ठरवले की 3 प्रभाग पद्धत करायचा. मुळात देशात अशी कोणतीही पद्धत नाही. कोणत्याही राज्यात, कोणत्याही महापालिकेत अशा प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. कायद्याने पाहिलं तर खासदार, आमदार आणि महापालिकेला एक उमेदवार, अगदी ग्रामपंचायतीसाठीही एक उमेदवार, अशीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरु झालं आणि का, याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबिज कर

मृत्यूचा सापळा बनलेला सांगली-कोल्हापूर महामार्ग घेणार मोकळा श्वास , खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश!

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सांगली कोल्हापूर रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटी कडे हस्तांतरित ६ महिन्यांत नवीन रस्त्याचे भुमिपुजन होणार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. आज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार मा. नितीनजी गडकरी यांचेकडे खासदार धैर्यशील माने रत्नागिरी - कोल्हापूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगली पर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे हस्तांतरण  करण्याची मागणी केली. खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ सदर रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे हस्तांतरित करीत असल्याचे जाहीर केले व पुढील सहा महिन्यांत या रस्त्याचा डीपीआर तयार करून घेऊन नवीन रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करणार असल्याचे जाहीर केले. पूर्वी सांगली कोल्हापूर या बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बनविन्यात आलेल्या या रस्त्यावर यापूर्वी खर्च केलेली सर्व रक्कम राज्य शासन देणार असून हा रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे वर्ग झाल्यामुळे  मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याने खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नामुळे मोकळा श्वास घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 3.07 कोटी इतकी झाली

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 3.07 कोटी इतकी झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी मोदी यांची संपत्ती 2.85 कोटी इतकी होती. जी या वर्षी 22 लाखांनी वाढली आहे. मोदी यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना त्यांची संपत्ती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार पंतप्रधानांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील बरेच मंत्री हे शेअर बाजारात गुंतवणूक करतात, मात्र मोदींनी शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाहीये. बँका आणि इतर सुरक्षित माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे मोदी यांना आवडतं, ज्यामुळे अर्थव्यवस्था खालावली असली तरी मोदींच्या संपत्तीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मोदी यांनी राष्ट्रीय बचत सर्टिफिकेटमध्ये 8.9 लाखांची, जीवन विमा योजनेत 1.5 लाखांची आणि एल अँड टी इन्फ्रास्टक्चर बाँडमध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोदी यांचे गांधीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून तिथे 1.86 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी कोणतंही कर्ज काढलेलं नाहीये आणि त्यांच्याकडे स्वत:ची गाडीही नाहीये. मोदींकडे 45 ग्रॅम व

हुपरी नगरपालिका इमारत निधी मंजूरी साठी घेतली पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : हुपरी : हुपरी नगरपालिका इमारत निधी मंजूर करून आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री- मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची भेट घेतली तसेच हुपरी शहरातील उर्वरित सिटी सर्वे व्हावा यासाठी युवा नेते-मा.अमित दादा गाट, हुपरी नगरपरिषदचे प्रथम उपनगराध्यक्ष-तथा नगरसेवक-आयु. जयकुमार माळगे साहेब, प्रथम बांधकाम सभापती नगरसेविका सौ.सुप्रिया श्रीनिवास पालकर  पक्षप्रतोद-पै. रफिक मुल्ला साहेब, नगरसेवक - मा.सूरज बेडगे, मा.सुभाष कागले नगरसेविका- सौ.अनिता मधाळे  सामाजिक कार्यकर्ते-मनोज पाटील  सूर्यकांत रावण शशिकांत मधाळे, आदी ने भेट घेतली.

भाजपला सत्तेतून हद्दपार केल्यानंतर राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे पुरती ताब्यात घेतल्याचे चित्र आहे.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    सांगली :  महापालिकेच्या राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेत काँग्रेस दिवसेंदिवस नामधारी होत आहे. शब्द दिल्यानंतरही स्थायी सभापती निवडीत एकाकी पाडल्यानंतर अर्थसंकल्पातही कॉंग्रेसचा 'कार्यक्रम' करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या साथीने भाजपला सत्तेतून हद्दपार केल्यानंतर राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे पुरती ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. स्थायी सभापती निवडणुकीत 'चमत्कार' झाला नाही. भाजपने वरकरणी तरी आपले वर्चस्व तूर्त कायम ठेवले आहे. महापौरपदाच्या रुपाने राष्ट्रवादीकडे सत्तेचा सुकाणू आहे. तथापि उपमहापौर पद पदरात असलेली काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. कागदोपत्री भाजप नंबर एकचा पक्ष आजही आहे. काँग्रेस दुसऱ्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असताना सत्तेत राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवले आहे. आघाडी असली तरीही तांत्रिक बाबींमुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदावर समाधान मानावे लागत आहे. खरे तर आजघडीला सारेच सत्ताधारी आहेत. काँग्रेसवर नेहमीच कुरघोडीचा राष्ट्रवादीचा इतिहास आहे. मदन पाटील यांच्या पश्‍चात काँग्रेसकडे खमके नेतृत्व नाही. त्यामुळे संख्य

ठाकरे सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केलीय.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    मुंबई :  ठाकरे सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केलीय. गेल्या वर्षभरात जवळपास कोविडच्या ह्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंदच आहेत. सरकारच्या घोषणेनंतर ती 7 ऑक्टोबरपासून उघडली जातील. त्यामुळे भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलीय. ती पुढील प्रमाणे. 1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य 2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश 3.ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल 4.कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत. 5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं

सोमवारपासून काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    तळदंगे येथील पाणी पुरवठ्या बाबत तळंदगे ग्रामपंचायतीच्या   वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांना कामाबाबत तपशील विचारला. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी सोमवारपासून काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी लक्ष घालण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच जयश्री भोजकर, जयश्री शिरोळे, रूपाली कांबळे, जयश्री लोखंडे, कृष्णात पोवार, पिंटू कांबळे, मोहन भंडारे, तानाजी शिंदे, शब्बीर मुल्लाणी आदी उपस्थित होते आमदार राजूबाबा आवळे

किरीट सोमय्या यांनी आपला दौरा संयमाने करावा.हसन मुश्रीफ

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    कोल्हापूर - किरीट सोमय्या हे मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. जिल्ह्यात आमच्या राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपची परिस्थितीही त्यांनी पाहावी, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगाविला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असताना त्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले होते. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्यांबाबत माझ्यावर आरोप केले होते. कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना मागच्याव

बोरपाडळे घाटात कारने अचानक पेट घेतल्याने एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील  बोरपाडळे घाटात कारने अचानक पेट घेतल्याने  एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू  झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी दुपारी बोरपाडळे घाटातून हॉटेलच्या दिशेनं जाताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भररस्त्यात ही दुर्घटना घडल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे. संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या हॉटेल व्यावसायिकाचं नाव अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय-32) असून ते आजरा तालुक्यातीलल पिंपळगाव झुलपेवाडी येथील रहिवासी आहेत. मृत अभिजित हे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास आपल्या कारने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील आपल्या धाब्याच्या दिशेने जात होते. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. या आगीचं रुप इतकं भयंकर होतं की कारने एका क्षणातच रौद्ररूप धारण केलं.  आगीचा भडका इतका भयंकर होता की, त्यांना कारमधून बाहेरही येता आलं नाही. या दुर्दैवी घटनेत अभिजित यांचा जागीच हो

गणराया अॅवार्ड प्रथम क्रमांक Rk ग्रुप मानेनगर रेंदाळ ला मिळाला

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : हुपरी :  साल 2021 चा कोल्हापूर जिल्हा पोलीस दल हुपरी पोलिस  ठाणे अंतर्गत रेंदाळ शहर मर्यादित गणेश चतुर्थी 2021व रक्तदान शिबिरा मध्ये मंडळातर्फे रक्तदान केल्याबंद्दल व सर्व सामाजीक कार्याबद्दल गणराया अॅवार्ड प्रथम क्रमांक Rk ग्रुप मानेनगर रेंदाळ ला मिळाला तसेच हुपरी पोलिस स्टेशनचे आमच्या मंडळातर्फे हार्दिक  आभार व्यक्तकरण्यात आले.

सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन.

Image
  सांगली :  ऊस वाहतूकदारांच्या अनेक समस्या आहेत, मात्र ते संघटित नाहीत. त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी गुरुवारी (ता. ३०) सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी बारा वाजता मार्केट यार्डातील सहकार भवनात मेळावा होणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी मजूर कोट्यवधीचा गंडा घालतात. यामुळे गेल्या काही वर्षांत तब्बल २०० वाहतूकदारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे तोडणी मजुरांसाठी दिल्या जाणाऱ्या उच्चलींना विमा संरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी आहे. पोलिस व आरटीओकडून होणारी लूट थांबली पाहिजे. अलीकडच्या काळात ट्रॅफिक व ओव्हरलोडच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतो. तो थांबला पाहिजे. ऊस वाहतूक महामंडळाची स्थापना केली पाहिजे. या महामंडळाकडे मजुराची नोंदणी झाली पाहिजे. नोंदणीकृत मजुरांचा पुरवठा साखर कारखान्यांना झाला पाहिजे. टोल माफी मिळाली पाहिजे. साखर कारखान्यांनी वाहत

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरेना कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    नाशिक :  नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने  चांगलीच कंबर कसली आहे. राज ठाकरे   नाशिक दौऱ्या दरम्यान मनसेकडून पोलिसांची परवानगी न घेता शहरात विनापरवानगी हॉर्डींग लावण्यात आले. त्यावरून आता हा हॉर्डिंग वॉर चांगलाच तापला आहे, यानंतर आज (ता.२३) पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. दरम्यान काल (ता.२२) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय फलक पोलिसांनी महापालिकेच्या पथकांकडून काढून घेतले. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध दर्शवला. मात्र, पोलिस संरक्षणात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक काढून घेतले. नियम मोडाल तर.....- पो. आ. दीपक पांडे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. आगामी सण उत्सव, निवडणुकांमुळे फलकबाजीवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फलक लावण्यासाठी त्यावरील मजकूर पोलिसांकडून मंजूर करणे आवश्यक आहे. त

सरकारचा त्रिसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय , तिन्ही पक्षांसमोर राजकीय पेच

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर :   बहुसदस्य… एक प्रभाग… दोन प्रभाग… असे करत करत अखेर राज्य सरकारने बुधवारी त्रिसदस्य प्रभाग (वॉर्ड) पद्धतीचा निर्णय घेतला. परंतु, जानेवारीपासूनच कोल्हापुरात महापालिका निवडणुकीचे रणांगण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही स्वबळावरच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु, आता आघाडी सरकारनेच त्रिसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला असल्याने आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार हा प्रश्न आहे. तिन्ही पक्षांसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. काहीही झाले तरी तिन्ही पक्षांचा भाजप-ताराराणी आघाडीबरोबर सामना असेल हे स्पष्ट आहे. कोल्हापूर महापालिकेत 2005 पासून पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. 2010 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परिणामी, समविचारी काँग्रेस-राष्ट्र

राज्यातील स्थानिक नागरी संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी वटहुकूम काढण्यात येणार

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : राज्यातील स्थानिक नागरी संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी वटहुकूम काढण्यात येणार आहे. एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशांच्या अधीन राहून हा निर्णय घेतल्याने पुन्हा नव्याने परवानगीची गरज राहणार नाही. राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसींना आरक्षण देण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने पूर्वीच घेतला आहे. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत राहून आरक्षणाचा वटहुकूम काढण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागरी स्थानिक संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणा

काय सांगता राव....रेशन दुकानातून नागरिकांना आता पासपोर्ट , पॅनकार्ड, वीज, पाणी बिल आणि इतर सेवा उपलब्ध करुन दिली जाणार

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    रेशन दुकानां संदर्भात मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रास्त दरात धान्य पुरवठा करणाऱ्या रेशन दुकानातून नागरिकांना आता पासपोर्ट आणि पॅनकार्ड, वीज, पाणी बिल आणि इतर सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पॅनकार्ड आणि पासपोर्टसाठी लांब न जाता घराजवळचं अधिकाधिक सेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे देशातील सर्व रेशन दुकानं आता कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये बदलली जाणार असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा य़ा ठिकाणी दिल्या जाणार आहेत. यासाठी अन्न व पुरवठा मंत्रालयाने सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडशी एक करार करत योजना तयार केली आहे. यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार असून रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत. वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये भरुन देण्याची सुविधा दिली जाणार आहे. दुकानदारांना योजना निवडण्याची मुभा रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना यातील कोणत्या सुविधा पुरवायच्या किंवा निव