इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविडसह अन्य आजारांवर आजपासून उपचार सुरु..

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : इचलकरंजी : 

अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शहर व परिसरामध्ये साथीच्या रोगांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यू, मलेरिया व हिवताप यांसारख्या आजारांनी नागरिकांचे स्वास्थ बिघडत चालले आहे. या पार्श्वभूमीवर  १००% कोविड रुग्णालय असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे केवळ कोविड रुग्णालय न ठेवता याठिकाणी अन्य आजारांवरील उपचार सुरु होणेबाबत *आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्यास यश आले असून इंदिरा गांधी रुग्णालयातील तळमजल्यावर विविध आजारांवर उपचार आजपासून सुरु करण्यात आले आहेत.

 शिवाय वरचा मजला कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इचलकरंजीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कोविडसह अन्य आजारांवर उपचार मिळणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post