लेटेस्ट न्युज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

इचलकरंजी (प्रतिनिधी)

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला परंतू त्यांचे सुपुत्र आदरणीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना कोरोनाच्या नावाखाली मंदिरे बंद करुन सर्व व्यवहार सुरु ठेवले आहेत. यांना सभा, निवडणूका चालतात आणि मंदिरे मात्र नाही.या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व हिंदू देवदेवतांची मंदिरे खुली करावीत यासाठी कोल्हापूर जिल्हा व हातकणंगले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज इचलकरंजी येथील हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले प्रखर विचार व्यक्त केले.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, हुपरीचे नगरसेवक व मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील, इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील, कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर, रोजगार सेना जिल्हाध्यक्ष राजू निकम, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष रवि गोंदकर व पदाधिकारी तसेच मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post