मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार.. किरीट सोमय्यादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कराड : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आज पहाटे साडेचारच्या सुमारास कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्त ही कारवाई केली.किरीट सोमय्या   कोल्हापूर जाण्यासाठी निघाले होते. त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फालोअप केला होता. त्यावेळी कऱ्हडला थांबण्यास ते तयार झाले.

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वााजता सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कऱ्हाडला उतरले आहेत. ''प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे,'' अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येथील शासकीय विश्रामगृहात ते थांबले असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत.अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तथाकथित घोटाळ्याची अधिक माहिती मिळविण्यासाठी मुंबईहुन कोल्हापूरकडे निघालेले किरीट सोमय्या सकाळी पहाटे 4 वाजता कऱ्हाड मध्ये उतरले.कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस किरीट सोमय्या यांना वाजवण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे किरीट सोमय्या ज्या महालक्ष्मी एक्स्प्रेस ने कोल्हापूरकडे निघाले होते त्या गाडीत पुण्यामध्येच दाखल झाले. किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा करत अप्पर पोलीस आयुक्त यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस देत कऱ्हाड मध्ये उतरण्याची विनंती केली. यानंतर किरीट सोमय्या हे कऱ्हाड मध्ये उतरले.

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी सर्किट हाऊस येथे ठेवले आहे.आज 10 वाजता किरीट सोमय्या हे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आणखी एक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती दिली . किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषदेनंतर पोलिसांकडून मुंबई मध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला असला तरीही दोन दिवसांनंतर कोल्हापूरचा दौरा करेल असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post