किरीट सोमय्या यांनी बिनबुडाचे आरोप केले असून त्यांच्यावर शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार...ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ .दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : . आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि भाजप जिल्हा अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी काही पुरावे दिले. यावर किरीट ‌ सोमय्या यांनी वक्तव्य केले.त्यांनी कोल्हापुरात येऊन माहिती घ्यावी आणि आरोप करावेत. असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सोमय्या यांना दिला. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याबाबत मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बिनबुडाचे आरोप केले असून त्यांच्यावर शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच सोमय्या यांना कारखान्याबाबतची कोणतीही माहिती नाही, मात्र त्यांना ही माहिती देण्याचे काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजित सिंह घाटगे यांनी केले आहे. घाटगे यांचा पैरा लवकरच फेडू असे सांगताना चंद्रकांतदादा यांनी आणलेल्या हायब्रीड रस्ते प्रकल्पाची कायदेशीर तज्ज्ञांमार्फत माहिती घेऊन, याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

खोट्या आरोपाच्या विरोधात दोन आठवड्यांमध्ये कोल्हापूर येथील सेशन कोर्ट मध्ये सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

मुश्रीफ म्हणाले, गेली सतरा वर्षे मी मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करत असून, अशा प्रकारचा कधीही आरोप झाला नाही. सोमय्या यांनी हा आरोप करून माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले आहे. म्हणूनच या खोट्या आरोपाच्या विरोधात दोन आठवड्यांमध्ये कोल्हापूर येथील सेशन कोर्ट मध्ये सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. गत विधानसभा निवडणुकीवेळी देखील या माध्यमातून माझ्या घरावर कारखान्यावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला, मात्र त्यात कोणतेही आक्षेपार्ह कागद मिळाले नाहीत, या केसचा निकाल अजून प्रलंबित आहे. असे असताना पुन्हा एकदा केंद्रीय संस्थांकडे तक्रार करण्यात येत आहे. अशा तक्रारींना मी घाबरत नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post