मार्गदर्शक सूचनांचा भंग करून साउंड सिस्‍टीम लावल्याप्रकरणी शहरातील दोन मंडळांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल


 कोल्हापूर : कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करून साउंड सिस्‍टीम लावल्याप्रकरणी शहरातील दोन मंडळांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. यात छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या नंदकुमार वळंजू यांच्यासह सव्वाशे कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत तर राजारामपुरी पोलिस ठाण्यात १२ व्या गल्लीतील गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षावर गुन्हा दाखल केला.मार्गदर्शक सूचनांचा भंग करून साउंड सिस्‍टीम लावल्याप्रकरणी शहरातील दोन मंडळांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती :

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, तसेच गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नयेत अशा सूचना दिल्या आहेत. या आदेशाचा भंग करून छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाने सायंकाळी मिरवणूक काढली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी नंदकुमार वळंजू, सुहास भेंडे, दीपक गाडवे, नंदकिशोर जमदाडे, महंमद पठाण, पंडितराव पोवार, प्रमोद सुतार, नितीन पाटील, प्रतीक ओतारी, अक्षय पाटील, आकाश चव्हाण, विवेक माळी, निखिल गावडे यांच्यासह १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.

दरम्यान, राजारामपुरी १२ व्या गल्लीतील गणेश तरुण मंडळाच्या मंडपासमोर ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून डॉल्बी वाद्याचे साहित्य जमवून ते वाद्य वाजवून गर्दी करून नृत्य करणाऱ्या मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांवरवरही गुन्हा दाखल केला. यात अध्यक्ष निखिल श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्ष ओंकार अनिल घोडके, मंडळाचे सदस्य व डॉल्बीचे साहित्य जमविणारा ऑपरेटर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई केली. राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते रात्री मंडपासमोर डॉल्बी लावून नाचत असताना हा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, राजारामपुरी १२ वी गल्लीतील गणेश तरुण मंडळाच्या मंडपासमोर ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून डॉल्बी वाद्याचे साहित्य जमवून ते वद्या वाजवून त्यांच्यासमोर गर्दी करुना नृत्य करणाऱ्या मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांवरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये, अध्यक्ष निखिल श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्ष ओंकार अनिल घोडके, मंडळाचे सर्व सदस्य व डॉल्बीचे साहित्य जमविणारा ऑपरेटर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई केली आहे. राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते रात्री ८.१० ला हे सर्व कार्यकर्ते मंडळाच्या मंडपासमोर डॉल्बी लावून नाचत असताना हा गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post