कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केले ,तब्बल 21 लाख रूपये किमतींचा गुटखासाठा हस्तगतदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केलेली आहे. तब्बल 21 लाख रूपये किमतींचा गुटखासाठा हस्तगत  आला आहे. जमीर अरूण पटेल (वय-45, रा.मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उचगावजवळ (ता. करवीर) वाहन पकडून त्यातून तब्बल 21 लाख रुपये किमतीचा गुटखासाठा हस्तगत करण्यात आला. जमीर अरुण पटेल याला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकातून गुटखा व अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा होती. कर्नाटकातील संकेश्वर, निपाणी परिसरातून पुणे बंगळूर मार्गावरून पान मसाला व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली.

या माहितीनूसार सकाळी पुणे- बंगळूर मार्गावर सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, वाहनाचा पाटलाग करत उचगावजवळ या वाहनास अडवण्यात आले. वाहनामध्ये 21 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या कारवाईमध्ये आकाश पाटील, मोहन गवळी आयुब शेख, दिगंबर सुतार, आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता,

Post a Comment

Previous Post Next Post