कोल्हापूरात आज जिल्हाबंदी आदेश लागू ,किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमैय्या आज सोमवारी (ता.२०) येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी जिल्हाबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार सकाळी ५ वाजल्या पासून रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येण्यास बंदी आहे.

प्रशासनाकडून आलेल्या बंदी आदेशातील माहितीनुसार, भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. १८ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत सोमैय्या यांचा निषेध करण्यात आला असून ते कोल्हापुरात आल्यास त्यांना दुष्परीणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांचा दौरा, वेळ ठिकाण

सकाळी ७.३० रेल्वे स्थानकावर आगमन.

८.०० शासकीय विश्रामगृह

९.०० अंबाबाई दर्शन

९.४५ भाजपा कार्यालय भेट.

१०.०० ते ११.३० कागलकडे प्रयाण

११.३० ते १२.३० संताजी घोरपडे कारखान्याला बाहेरून भेट

१२.०० ते. १२.४५ पोलिस स्टेशन मुरगूड

१२.४५ ते १.०० मुरगूड पोलिस स्टेशन भेट.

१.१५ ते २.०० कोल्हापूरकडे प्रयाण

२.०० ते ३.०० भोजन

३.१५ ते ३.४५ पोलिस अधीक्षक भेट

४.०० ते ५.०० पत्रकार परिषद

५.१५ ते ५.४५ ग्रामिण पदाधीकारी बैठक

६.०० ते ६.३० शहर पदाधिकारी बैठक

८.१५ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण

(भोजन, बैठका व पत्रकार परिषद हाॅटेल अयोध्या येथे होणार आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post