दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर: कोल्हापुरात आज सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे आज सकाळपासूनच कोरोनाचे नियम पाळत बाप्पाचे आगमन केले जात आहे.दरवर्षी शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाप्पा घेऊन जाण्यासाठी गर्दी होते. मात्र यंदा दरवर्षीप्रमाणे असणारा हा उत्साह कुठेतरी कमी दिसत आहे. कोरोना महामारी, त्यातच सलग दोन वर्षे आलेला महापूर याचा फटका कोल्हापूर वासियांना बसला आहे. त्यामुळे कोल्हापुरात साध्या पद्धतीने बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र कोल्हापुरात छत्रपती घराण्यात शाही पद्धतीने गणपतीचे आगमन केले जाते. लाडक्या बाप्पाला पालखीत बसवून घरी नेण्याची ही परंपरा आहे.
अशी आहे परंपरा
वीस ते पंचवीस मानकऱ्यांच्या उपस्थित शाही लवाजम्यासह छत्रपती घराण्यात दरवर्षी बाप्पाचे आगमन केले जाते. हा बाप्पा पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये बसवून राजवाड्यात नेला जातो. दरवर्षी शाहूपुरी कुंभार गल्लीतील शाही लवाजम्यासह मानकरी गणपती बाप्पाला नवीन राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन येतात. काही वेळ बाप्पा या ठिकाणी विसावा घेतो. आणि परत पुढे मग नवीन राजवाड्यात नेला जातो. त्या नंतर पूजा-अर्चा झाल्यानंतर बाप्पा विराजमान होतात.
कोल्हापुरात छत्रपती घराण्यात शाही पद्धतीने गणपतीचे आगमन केले जाते. लाडक्या बाप्पाला पालखीत बसवून घरी नेण्याची ही परंपरा आहे.
गणेशोत्सवात कोणतेही निर्बंध लावले जाणार नाहीत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र कोरोना वाढू नये यासाठी खबरदारी घ्या.असे आवाहनही त्यांनी केले आहे. या नियमांचे पालन करत कोल्हापुरात गणेशाचे आगमन केले जात आहे.