अभिष्टचिन्तन...!दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

             अतिशय गरीब व खड़तर परिस्थितीतून निमशिरगांव सारख्या खेड़े गावातुन बाहुबली , कोल्हापूर, येथे शिक्षण घेवून, फिरोजाबाद उत्तरप्रदेश येथे शारीरिक शिक्षण याचे ट्रेनिंग घेवून रयत शिक्षण संस्थेत वेगवेगळ्या गावी प्रामाणिकपणे नोकरी करीत स्वतःचे व इतरांचे जीवन उभा केले. हिंदी, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण या विषयावर प्रभुत्व मिळवून खेराडेवांगी, तुळस, सावळज, हुपरी, शिरोळ अशा विविध ठिकाणी हाडाचे शिक्षक बनून अनेक विद्यार्थी घडविले. अगदी माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यासारख्या विद्यार्थ्यानाही घडविले. पण कधी अशा गोष्टीचा गवगवा न करता ज्ञानदान केले.

             आपल्या समाजकार्याची सुरवात हुपरी येथून केली. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचें कार्याने प्रेरित होवून बालब्रम्हचारी संजयजी गोपलकर, व विमल ताई मुराबट्टे अक्का बाल ब्रम्हचारी अनिल ठिकणे सर यांचें सनिध्यतून धर्मकार्याची ओढ़ निर्माण झाली. हे करता करता सोबतच आचार्य सन्मतीसागरजी निर्माण झाले. तन - मन व स्वधनाने कोल्हापूर, सांगली व कर्नाटक भागात गांवोगावी जावून सन 1988 ते 1992 या काळात वीर महिला मंडळाच्या तब्बल 50 शाखा स्थापन केल्या. महिला मंडळाचे 1 ले अधिवेशन कुपवाड़ येथे माजी आमदार प्रा. शरद पाटील सर यांचें अध्यक्षतेखाली सम्पन्न केले. पाठशाळा चालविल्या. त्यांच्या परिक्षेसाठी अगदी बेळगांव हेब्बाळ पर्यन्त स्वतःच्या स्कूटरने प्रवास केला. व खऱ्या अर्थाने संस्काराचा पाया रचला. 

          समाज अथवा कोणत्याही संस्थेच्या मान -सन्मान अथवा पदाची अपेक्षा न करता ज्यानी समाजकार्य केले , आम्हा कुटुम्बियाची धर्म व  समाजाप्रती आस्था निर्माण केली.आम्हास घडविले. असे आंमचे पूज्य पिताश्री, माझे श्रद्धास्थान *धर्मानुरागी आदरणीय श्री.बी. पी. पाटील सर* जयसिंगपुर यानी आज वयाची 80 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्हा सर्व कुटुम्बियामार्फत खुप खुप शुभेछ्या. त्याना दीर्घायुष्य लाभों. हीच जिनेश्वरचरणी प्रार्थना

Post a Comment

Previous Post Next Post