म्हणून कोरोनाच्या लाटा आणल्या जात आहेत.....मनसे अध्यक्ष राज ठाकरेदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुंबई  : लॉकडाऊनचा फायदा घेऊन हजारो कोटींची कामे वाजवली जाता आहेत. त्या विरोधात कोणी काही बोलू नये,  मोर्चे काढू नये,  सभा घेऊ नये, म्हणून कोरोनाच्या लाटा आणल्या जात आहेत,  असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला.  

राज ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा जाणीवपूर्वक आणल्या जात आहेत. लाटा यायला काही समुद्र आहे का ? विनाकारण इमारती सील करायच्या. याआधी देशात काही रोगराई आलीच नव्हती का ?, असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित  केले.राज्यात कुठेच काही बंद नाही. सगळं काही सुरू आहे. राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. जन आशीर्वाद यात्रा सुरू आहेत. नारायण राणे आणि शिवसेनेच्या लोकांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. बाळासाहेबांच्या नावानं हडपलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या रोजच्या रोज येताहेत. त्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यांच्यासाठी लॉकडाऊन नाही. फक्त दहीहंडी किंवा सण-उत्सव आले की लॉकडाऊन लागतो. सणांमधूनच करोना पसरतो का?, असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी केला. सरकारला  जेवढं हवं आहे,  तेवढं चालवायचं. बाकीच्यांना बंद करून ठेवायचं आणि जनतेला घाबरवून ठेवायचं. त्यामुळे दहीहंडी दणक्यात साजरा करण्याचा निर्णय मनसेने घेतल्याचे  राज ठाकरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post