भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ..दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचलनालय) एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे.त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

चलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध एप्रिल २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. आज, आरोपपत्र दाखल करण्यात आले.

नक्की काय आहे प्रकरण-

भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता

Post a Comment

Previous Post Next Post