राज्यात आगामी काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार , या निवडणुकांवेळी मतदानासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असल्याची शक्यता आहे.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

राज्यात आगामी काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवेळी मतदानासाठी ईव्हीएम मशीन  ऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट पेपर वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं म्हणत संकेत दिले आहेत.सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट पेपर वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. लवकरच राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यामुळे आता सहकारी संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर होतात की ईव्हीएम मशीनद्वारे होतात, हे वं लागणार आहे.

दरम्यान, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राडज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. दरम्यान, आता ही मुदत संपल्याने आणि राज्य सरकारने पुन्हा स्थगितीचे आदेश दिल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.

राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीचे आदेस न दिल्याने २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post