राज्य सरकारने मागील दोन-तीन दिवसांत 300 हून अधिक अधिकाऱयांना बदली तसेच बढती दिलीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

राज्य सरकारने मागील दोन-तीन दिवसांत 300 हून अधिक अधिकाऱयांना बदली तसेच बढती दिली आहे. यातील बहुतांशी अधिकारी हे बऱयाच वर्षांपासून मंत्रालयात एकाच खात्यात ठाण मांडून बसले असल्याचे बोलले जात आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनाही ज्या अधिकाऱयांना हलवणे जमले नव्हते त्या अधिकाऱयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत नियमानुसार बदली तसेच बढती मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.

राज्य सरकारने अपर सचिव, उपसचिव, सहसचिव दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदल्या मागील दोन ते तीन दिवसांत केल्या आहेत. यामध्ये अनेक अधिकाऱयांना बढतीही मिळाली आहे. यातील काही अधिकारी हे मंत्रालयात अनेक वर्षे ठाण मांडून होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत चर्चा करून या अधिकाऱयांच्या बदलीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सचिव, कॅबिनेट सदस्यही त्यांना बदलू शकत नव्हते

मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. त्या अधिकाऱयांना बदलण्याचा प्रत्यन पृथ्वीराज चव्हाण तसेच फडणवीसांच्या काळातही करण्यात आला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत ते शक्य झाल्याची चर्चा मंत्रालयातील अधिकारी वर्गात रंगली आहे.

कोरोनामुळे रखडलेल्या बदल्या पार पडल्या

सरकारी विभागात सहा वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकाऱयांची बदली होत असते. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही अधिकारी एका ठिकाणी राहू शकत नाही. या अधिकाऱयांच्या होणाऱया बदल्या या कोरोना संकटाच्या काळात रखडल्या होत्या. सरकारने बदल्या न करण्याबाबत आदेशही काढले होते. आता सर्व सुरळीत सुरू होत असताना या रुटीन बदल्या करण्यात आल्या असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. मागील दोन दिवसांत झालेल्या बदल्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना जमले नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवले! खासदार सुप्रिया सुळे यांनी केले कौतुक

300 अधिकाऱयांच्या बदलीसंदर्भातील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करून उद्धव ठाकरे यांचे एकप्रकारे कौतुक केले आहे. 'देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांनाही जे जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले' अशा शीर्षकाखाली हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मंत्रालयात अनेक अधिकारी हे वर्षानुवर्षे एकाच विभागात होते. यापूर्वी त्यांना हलवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, परंतु त्यात ते यशस्वी झाले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र त्यात यशस्वी झाले असे या वृत्तात म्हटले 

Post a Comment

Previous Post Next Post