आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र (डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप (?)


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी पूर्व एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात आमदार रमेश कोंडीराम लटके यांची पात्रता सिद्ध असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

विद्रोही पत्रकार पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी माहिती अधीकारातून मिळवलेल्या शासकीय दस्ताऐवजात असे आढळून आले आहे की, पॉकेट क्र. ५, परिशिष्ट २, अ क्र ६३९  याची पात्रता सिद्धता रमेश लटके या नावाने झाली आहे, पुढे महामंडळाने दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, करारनाम्यातील तरतुदीनुसार (पान क्र. ३०, कलम ४.१) विकासकाने सर्वेक्षण करून झोपडीधारकांच्या कागदपत्रावरून मूळ परिशिष्ट तयार करून महामंडळास सादर केले व त्यानुसार महामंडळाने पत्र क्र. ३९१ दि. १०/०२/१९९९ रोजी सदर परिशिष्ट क्र. २ यास मंजुरी पारित केली. या सर्व पात्र झोपडीधारकांची कागदपत्र विकासाकाकडे असून महामंडळास त्यांनी सादर केलेली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, नगरसेवक आमदार अशी पद्य भूषवून  स्वतःचे मालकीचे खाजगी अपार्टमेंट मध्ये घर असतांना एसआरये प्रकल्पात कशी काय पात्रता सिद्ध होते(?) याचा अर्थ असा आहे की आमदार साहेबांनी आपले राजकीय बळ वापरून सदनिका पात्र करवून घेतली आहे.

असे प्रकार किती झाले असावेत, मोठं मोठ्या संविधानिक पदावर नियुक्त असतांना जनतेच्या विश्वसहर्ता टिकवून न ठेवता स्वतःच्या स्वार्थासाठी निवडुन आलेल्या  पदाचा वापर करतो म्हणजे मतदारांच्या विश्वासाचा खुनच झालाचा प्रकार असल्याचे डॉ. राजन माकणीकर म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अंधेरी परिसरातील गरीब झोपडी वाशीयांना सदनिका प्राप्त झाली असून त्यांचा वास्तव्य असलेल्या राहत्या घरातून बाहेर काढण्यासाठी आमदार रमेश लटके एमआयडीसी अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत वास्तव्यास असणाऱ्या सदनिका धारकाला घराबाहेर हाकलून त्यांच्या घरांमध्ये स्वतःच्या हितचिंकांना टाकण्यापेक्षा २०११ च्या एसआरये कायद्यांनव्ये सरसकट पात्रता घोषित करून नवीन इमारत बांधून हितचिंतकांना सदनिका प्राप्त करून देऊ शकतात. 

मात्र आमदार साहेबांनी गरिबांना बेघर करून त्यांचे संसार उघड्यावर आणण्याची सुपारी घेतलीये की काय? असा सवालही डॉ राजन माकणीकर  व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी उपस्तिथ केला.

येणाऱ्या निवडणुकीत अश्या स्वार्थी आमदारांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे आणि यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेमधून निस्वार्थी नवा चेहरा उदयास आणेल असा आशावाद डॉ. राजन माकणीकर व कॅप्टन श्रावन गायकवाड (रिपाई डी- राज्य महासचिव) यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post