किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर ‘हे’ मंत्री

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषेद घेत ठाकरे सरकार व सरकामधील मंत्र्यावर अनेक आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी हजारो कोटी रुपयाांचा घोटाळा केला असल्याचा आपोर सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी 2700 पानी पुरावे असल्याचे सांगितले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारच्या 11 लोकांची नावे मी घेतली होती मात्र दुर्दैवाने या यादीत वाढ झाली आहे. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव वाढले असून त्यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. यासंदर्भात 2700 पानी पुरावे माझ्याकडे आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला असून हसन मुश्रीफ यांच्या पत्नीचे शेअर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आहेत. तसेच संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे. असे आरोप त्यांनी लावले आहेत.

“CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे.

त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे” असा दावा सुद्धा सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार

Post a Comment

Previous Post Next Post