क्राईम न्यूज : सातवे येथील १८ वर्षीय शाळकरी मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील १८ वर्षीय शाळकरी मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे, वय 18 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवतेजचे गावातील मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. यामधून त्यास जबर मारहाण करण्यात आली असून उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला आहे.

शिवतेजचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. पण संशयित आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून नातेवाईक आंदोलन करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post