एका बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख सार्वजनिक केल्या प्रकरणी बॉलिवूडच्या 38 सेलिब्रिटींविरोधात तक्रार दाखल झाली आहे. यात सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण या सेलिब्रिटींचाही समावेशदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 एका बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख सार्वजनिक केल्या प्रकरणी बॉलिवूडच्या 38 सेलिब्रिटींविरोधात तक्रार दाखल झाली आहे. यात सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.हैदराबाद येथे 2019मध्ये एक भयंकर घटना घडली होती. येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळलं होतं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

याच दरम्यान काही सेलिब्रिटींनी या पीडित तरुणीचा फोटो आणि नाव आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दिलं होतं. त्यातून तिची ओळख सार्वजनिक करण्यात आली होती.

कायद्यानुसार, बलात्कार पीडितेचं नाव, फोटो यांची ओळख सार्वजनिक करणं गुन्हा आहे. बॉलिवूडसह काही दाक्षिणात्य कलाकारांनीही पीडितेचे फोटो व्हायरल करून तिला श्रद्धांजली वाहत या प्रकरणी संताप व्यक्त केला होता.

त्यामुळे या सेलिब्रिटींवर दिल्ली येथील वकील गौरव गुलाटी यांनी तक्रार केली आहे. त्याखेरीज त्यांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 228अ अन्वये तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या सेलिब्रिटींनी संवेदनशीलता राखणं गरजेचं असताना अतिशय बेजबाबदारपणे बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक केली. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post