महिला उन्नती संघ नवी दिल्ली च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रवक्ता श्रीदेवी पाटील यांचा सन्मान

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

महिला उन्नती संघ भारत या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांचा महिलांचा व सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला.. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त रजनी गोयल समाज कल्याण अधिकारी शैलेंद्र बहादुर सिंह संस्थेचे मुख्य समूह संरक्षक व ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र बच्चन ग्रेटर नोएडा पत्रकार असोसिएट अध्यक्ष धर्मेंद्र चंदेल संरक्षक इंदू गोयल संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राहुल वर्मा महासचिव अनिल जी भाटी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 

यावेळी गौतम बुद्ध जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले त्यामध्ये विशेष करून महिलावर होणारे अत्याचार उत्पीडन बलात्कार घरेलू हिंसा इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली महिला उन्नती संघाच्या नवनियुक्त महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्रीदेवी पाटील यांचा समाज कल्याण अधिकारी शैलेंद्र बहादूर सिंग उपायुक्त रजनी गोयल संरक्षक इंदू गोयल अध्यक्ष डॉक्टर राहुल वर्मा संरक्षक व ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र बच्चन तसेच इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला श्रीदेवी पाटील या गेली वर्षभर इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी म्हणून काम करत आहे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महासचिव म्हणून अलीकडेच पदोन्नती देण्यात आली नव्याने नवी दिल्लीच्या पत्रकार वेल्फेअर फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी त्यांची निवड करण्यात आली आपल्या मनोगतामध्ये श्रीदेवी पाटील यांनी पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी तसेच महिलांच्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची काम करण्याचे ठामपणे मनोगत व्यक्त केले अनिल जी भाटी यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली हा सर्व कार्यक्रम ग्रेटर नोएडा च्या नॉलेज सिटीतील मंगलमय इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झाला

Post a Comment

Previous Post Next Post