पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरेना कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने  चांगलीच कंबर कसली आहे. राज ठाकरे   नाशिक दौऱ्या दरम्यान मनसेकडून पोलिसांची परवानगी न घेता शहरात विनापरवानगी हॉर्डींग लावण्यात आले.त्यावरून आता हा हॉर्डिंग वॉर चांगलाच तापला आहे, यानंतर आज (ता.२३) पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. दरम्यान काल (ता.२२) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय फलक पोलिसांनी महापालिकेच्या पथकांकडून काढून घेतले. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध दर्शवला. मात्र, पोलिस संरक्षणात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक काढून घेतले.

नियम मोडाल तर.....- पो. आ. दीपक पांडे

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. आगामी सण उत्सव, निवडणुकांमुळे फलकबाजीवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फलक लावण्यासाठी त्यावरील मजकूर पोलिसांकडून मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर पोलिसांचा व मनपाचा परवानगी क्रमांक मिळाल्यानंतर फलक लावता येणार आहे. पोलिस आयुक्तांनी हा आदेश शुक्रवारी (ता.१७) काढला. मात्र, त्याच्या तीन दिवसांनीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली. राजकीय फलकबाजीमुळे परिसरातील दिशादर्शक व परिसराची माहिती देणारे फलक झाकले गेले. स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत नाराजी होती. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या नोटीसनंतरही मनसेकडून फलक काढण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी याचा अहवाल मनपाकडे दिला. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिस संरक्षणात परिसरातील सर्व राजकीय फलक काढून घेतले. या कारवाई दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी केलेल्या दाव्यानुसार रीतसर शुल्क भरून मनपाकडून परवानगी घेत फलक लावल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी कारवाईस विरोध दर्शवला होता, मात्र मनपाने सर्व फलक काढून घेत परिसर फलकमुक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post