पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह त्याच्या साथीदारांविरोधात एक हजार ४६४ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासह त्याच्या साथीदारांविरोधात एक हजार ४६४ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.यात कुंद्रालाच मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे.

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यात सुरुवातीला १ एप्रिल रोजी नऊजणांविरुद्ध तीन हजार ५२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. पुढे यात कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक राज बाहेर आले. मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न फिल्म रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असताना 'हॉटशॉट ॲप'चा कुंद्राच सूत्रधार असल्याचे आढळून आले. त्यानुसार कुंद्रासह साथीदार रायन थोर्पला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

कुंद्रा आणि रायनने अटक केलेल्या आरोपींशी संगनमत करून सिनेक्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या नवोदित तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अश्लील चित्रीकरण केले. तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ हे वेबसाईट तसेच मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड केले.Post a Comment

Previous Post Next Post