कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या चर्चेत आले आहेत.कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत. ही नोटीस किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना स्थानबद्ध केले आहेत.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचं हनन केले जात आहे. पोलिसांना सरकारी आदेशाचं पालन करावं लागतं. परंतु द्यायचे असेल तर लेखी आदेश द्यावेत. कुठल्याही प्रकारे लिखित आदेश न देता पोलिसांना सूचना दिल्या जातात. पोलिसांचा वापर करून आक्रमक होता येतं का? कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेण्याऐवजी बिघडवण्याचं काम कोण करतात? उद्या आमचे २०-२५ हजार कार्यकर्ते जमले तर तर परिस्थिती बिघडणार नाही का? असा सवाल त्यांनी केली.

तसेच ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेश विसर्जनालाही किरीट सोमय्यांना(BJP Kirit Samaiya) जाता येत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एका नेत्याला नजरकैदेत ठेवणं हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते. पोलिसांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तुघलकी कारभार करता येणार नाही. ही मोगलाई लागून गेली नाही अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक अशाप्रकारे ठाकरे सरकार दहशत माजवण्याचं काम करतंय. कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी असताना मुंबईत बाहेर पडण्यास का बंदी? महालक्ष्मी एक्सप्रेसनं मी कोल्हापूरला जाणार आहे. 

दिलीप वळसे पाटील तुम्ही अनिल देशमुख नाही. कुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस असताना माझ्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील मला मुंबईत गणेश विसर्जनाला जाऊ देत नाही. हम करे सो कायदा असा कारभार सरकारचा सुरु आहे. माझ्या घराबाहेर १०० पोलीस उभे केलेत. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post