तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची राज्य मंत्रीमंडळाची बैठकदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 मुंबई। गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी 10 जणांना परवानगी असणार आहे.गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडणार आहे.

गणेशोत्सवासाठी नियमावली

महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी 10 जणांना परवानगी असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे.

देशासह राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावरही निर्बंध लादण्यात येणार आहेत. काल (मंगळवारी) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत भाविकांना प्रत्यक्षदर्शन आणि मुखदर्शन घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्यमांद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असं यावेळी सांगण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post