दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला विमानतळ व विमान पाहण्याचा अनुभव

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग वसतीगृह मधील दिव्यांग विद्यार्थी यांनी कोल्हापूर येथील विमानतळ प्रत्यक्ष विमान  पाहुन आनंदीत झाले. कोल्हापूर विमातळ संचालक मा श्री कमल कटारिया स्टेशन मॅनेजर इंडिगो एअरलाईनचे मा श्री विशाल भार्गव कनिष्ठ कार्यपालक सं दि नि सुपरवायझर फायर मा श्री मनोज चौधरी यांनी श्रावणबाळ विकलांग वसतीगृह मधील दिव्यांग विद्यार्थी यांचे स्वागत करुण विमान लँडिंग माहिती देऊन प्रत्यक्ष विमानतळ दाखवले. या दिव्यांग मुलांना विमान दाखवून त्यांचा आंनद द्विगुणित केला. दिव्यांग विद्यार्थी यांना नाष्टा देण्यात आले. श्रावणबाळ विकलांग वसतीगृहाची माहिती संस्थेचे अध्यक्ष मा श्री सतीश जांगडे यांनी दिली.तसेच विमानतळ संचालक मा श्री कमल कटारिया यांचे श्रावणबाळ विकलांग वसतीगृह मार्फत दिव्यांग विद्यार्थी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार संस्थेचे सेक्रेटरी सौ रुपाली निशाणदार यांनी मानले.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेला हा प्रत्यक्ष अनुभव आणि विमान व विमानतळ याचे जवळून दर्शन या गोष्टी खूपच आनंददायी ठरल्या.दोन्ही हाताचे पंजा नसलेला श्रावणबाळ विकलांग वसतीगृह नांदणी मधील दिव्यांग विद्यार्थी चि सुरज सावळे याने आपली कला विमानतळ संचालक मा श्री कमल कटारिया यांना दाखवली ,त्यावेळी त्याचे कौतुकही करण्यात आले.

एकंदरीत हा विमानतळ भेटीचा अनोखा प्रयोग या मुलांच्या दृष्टीने खूपच सुखद ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post