फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय ...राज ठाकरे



दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 नाशिक - फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका करत राज ठाकरे यांनी प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा उद्देश काय हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, असा सवाल केला आहे.2012 मध्ये कॉंग्रेस आणि राष्टवादी कॉंग्रेसचे सरकार असताना एक उमेदवार होता, त्यानंतर त्यांनी एक प्रभाग पद्धत सुरु केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं जेव्हा सरकार आलं तेव्हा त्यांनी चार प्रभाग पद्धत सुरु केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पुन्हा एक प्रभाग पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आला.

त्यानुसार निवडणुकी आयोगाने राज्य सरकारला कळवलं एक उमेदवारचं उभा करायचा. आता परत काल महाविकास आघाडी सरकारने ठरवले की 3 प्रभाग पद्धत करायचा. मुळात देशात अशी कोणतीही पद्धत नाही. कोणत्याही राज्यात, कोणत्याही महापालिकेत अशा प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

कायद्याने पाहिलं तर खासदार, आमदार आणि महापालिकेला एक उमेदवार, अगदी ग्रामपंचायतीसाठीही एक उमेदवार, अशीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरु झालं आणि का, याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबिज करणं, आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करायचा आणि त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणं हा हेतू असतो, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

या गोष्टींचा त्रास लोकांना का, लोकांनी एका उमेदवाराला मतदान करण्याऐवजी तीन-तीन उमेदवारांना मतदान का करायचं, तीन तीन मशीनवर बटणं का दाबायची, जनतेला गृहीत धरायचं, आपल्याला हवे आहेत त्याप्रमाणे प्रभाग करायचे, हे योग्य नाही, कायदेशीर नाही, खरंतर निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post