जनतेची फसवणूक प्रकरणी आ. लटकेंवर ४२० अंनव्ये गुन्हा दाखल व्हावा.:- डॉ. माकणीकर

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुंबई :  (प्रतिनिधी):  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात स्वतःची सदनिका पात्र करवून शासन प्रशासन व जनतेची फसवणूक केल्या बद्दल आ. रमेश लटके यांच्या ४२० अंनव्ये गुन्हा दाखव व्हावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.*

मा. राज्यपालांकडे सदर प्रकरणाची तक्रार डॉ. राजन माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी केली आहे. बनावट (रेशनकार्ड) कागदपत्र सादर करून एमआयडीसी अंधेरी पूर्वेला होऊ घातलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात स्वतःची सदनिका पात्र करऊन घेतली गेल्याचा आरोप या तक्रारीतून केला आहे.

वस्तु स्थिती अशी आहे की एमआयडीसी कार्यालयात पात्रता सिद्धी झाल्याचा पुरावा मिळतो पण कोणत्या आधारावर पात्रता सिद्धी झाली याचा दस्तऐवज नसल्याचे माहिती अधिकारातून सांगण्यात आले आहे. हेतुपुरस्कर पणे केलेला हा प्रकार निंदनीय असून प्रत्येक्ष किंवा अप्रत्येक्ष प्रकरणात असलेल्या सर्वांना शासन होणे गरजेचे वाटत असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले.

तक्रारी मध्ये डॉ. माकणीकर यांनी एक समिती गठीत करून चौकशी करण्याची विनंती केली आहे व पुढे असे म्हणाले की, प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी कडून शासनाच्या प्रकल्पात चोरी करणे म्हणजे शासन व प्रशासनाची फसवणूक आहे यासंबंधी जनतेचाही विश्वासघात त्यांनी केला आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर निडर पणे अश्या प्रकरणाला वाच्यता फुटावी व अंधाराला चिरून प्रकाश दैदिप्यमान व्हावा आणि सत्य उजेडात येऊन गुन्ह्याला प्रतिबंध करण्याकरिता जीवाची पर्वा न करता आपल्या शोधपत्रकारितेतून लढा देतात मी त्यांचा सहकारी असल्यामुळे प्रकरणी दोघांच्याही परिवाराच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून दोन्ही कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे असे राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post