पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 3.07 कोटी इतकी झाली



दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 3.07 कोटी इतकी झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी मोदी यांची संपत्ती 2.85 कोटी इतकी होती. जी या वर्षी 22 लाखांनी वाढली आहे.मोदी यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना त्यांची संपत्ती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार पंतप्रधानांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळातील बरेच मंत्री हे शेअर बाजारात गुंतवणूक करतात, मात्र मोदींनी शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाहीये. बँका आणि इतर सुरक्षित माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे मोदी यांना आवडतं, ज्यामुळे अर्थव्यवस्था खालावली असली तरी मोदींच्या संपत्तीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मोदी यांनी राष्ट्रीय बचत सर्टिफिकेटमध्ये 8.9 लाखांची, जीवन विमा योजनेत 1.5 लाखांची आणि एल अँड टी इन्फ्रास्टक्चर बाँडमध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोदी यांचे गांधीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून तिथे 1.86 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आले आहेत.

पंतप्रधानांनी कोणतंही कर्ज काढलेलं नाहीये आणि त्यांच्याकडे स्वत:ची गाडीही नाहीये. मोदींकडे 45 ग्रॅम वजनाच्या 4 अंगठ्या आहेत ज्यांची किंमत 1.48 लाख रुपये इतकी आहे. 31 मार्च 2021 रोजी त्यांच्या बँक खात्यात 1.5 लाख रुपयांची रक्कम होती. मोदी यांच्याकडे रोकड रक्कम फक्त 36 हजार रुपयांची आहे. 2014 साली पंतप्रधान बनल्यापासून मोदींनी एकही संपत्ती विकत घेतलेली नाहीये. 2002 साली त्यांनी जागा विकत घेतली होती, ज्याचं मूल्य आजमितीला 1.1 कोटी रुपये इतकं आहे. जनसत्ता या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post