पिंपरी चिंचवड : अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेड बांधकामांवर कारवाई होणार ..दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 पिंपरी चिंचवड  :. लवकरच पिंपरी शिंचवड महानगरपालिका हद्दीतील असलेल्या अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेड बांधकामांवर कारवाई होणार असल्याचे आवाहन आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले.ज्या नागरिकांनी अनधिकृतपणे पत्राशेडचे  बांधकाम केले आहे त्यांना महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली असून पत्रा शेड काढण्यासाठी मुदत  सुद्धा दिली होती, मात्र पत्राशेड धारकांनी अद्यापही अनधिकृत बांधकामे काढल्याचे दिसून येत नाही.

जर पत्राशेड धारकांनी स्वतः हुन अनधिकृत बांधकामे 30-09-2021 पर्यंत निष्कासित केले नाही तर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल .तसेच सदर कारवाईचा खर्च देखील संबंधित मालकाकडून वसूल करण्यात येईल असे जाहीर आवाहन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post