ब्रेकींग न्युज : डॉ.तुषार निकाळजे यांना"प्रतिष्ठित प्राध्यापक " पुरस्कार जाहीर

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पाँडेचेरी :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. तुषार निकाळजे यांना प्रतिष्ठित प्राध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे. ई. एस.एन .पब्लिकेशन्स यांनी शिक्षक दिनानिमित्त दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी पॉंडेचरी येथे झालेल्या प्राइड ऑफ एज्युकेशन अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. तुषार निकाळजे यांना प्रतिष्ठित प्राध्यापक हा पुरस्कार जाहीर केला आहे . डॉ.तुषार निकाळजे यांनी प्रकाशित केलेली शैक्षणिक,,प्रशासन ,निवडणूक या विषयावरील दहा पुस्तके ब्रेल भाषेतील पुस्तक,अभ्यासक्रमातील संदर्भ  पुस्तके, राज्य व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील सहभाग, लघु चित्रपट निर्मिती, विद्यार्थ्यांना समुपदेशन  इत्यादींची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

या वेळी भारतातील  १९ राज्यांमधील शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ९८ व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले .या प्रसंगी पांडेचरी चे मा. कृषिमंत्री थेरूसी जयकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.रचना सिंग या उपस्थित होत्या. .त्यांनी संबंधितांना  पुरस्कार ,मानपत्र प्रदान केले. याप्रसंगी ई. एस. एन. पब्लिकेशनचे डॉ. जे. भानूचंदर व डॉ. अनुसूया देवी यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post