बिग बास्केट' या ऑनलाइन किराणामाल आणि भाज्या विक्री करणाऱ्या गोडाऊनला आग , आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाकदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 पुणे : सोमवारी रात्री बावधान बुद्रुकमधील 'बिग बास्केट' या ऑनलाइन किराणामाल आणि भाज्या विक्री करणाऱ्या गोडाऊनला आग लागली. रात्री साडेअकरा वाजता बावधान येथील गोडाऊनला ही आग लागली.रात्रीच्यावेळी आग लागल्याने गोडाऊनमध्ये फार लोक नव्हती. या आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण १२ फायर इंजिन्सच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

सुमारे २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. गोदामाचा लोखंडी सांगाड्याचे चॅनेलही वाकले इतकी भीषण ही आग होती. आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण १२ फायरगाड्या व वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. आग लागताच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहचत नव्हते. तेव्हा गावातील २ जेसीबीच्या सहाय्याने पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली. फायरगाड्यांमधील पाणी संपल्याने पाषाण येथून गाड्या पाणी भरून पुन्हा आणण्यात आल्या होत्या.

तिजोरीतील ८ लाख वाचविले

आग विझवित असतानाच तेथील व्यवस्थापकाने आत तिजोरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याचे सांगितले. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन ती तिजोरी बाहेर आणली. त्यातील ८ लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, तिजोरी जवळील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख रुपये जळून खाक झाले. सुमारे ३ तास ही आग धगधगत होती.

Post a Comment

Previous Post Next Post