फिरते विधी सेवा केंद्र व लोकअदालतीचा लाभ घ्यावा: प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. विजय पाटील

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सांगली : 

सांगलीः- सांगली जिल्हयातील नागरीकांनी फिरते विधी सेवा केंद्र व लोकअदालतीचा लाभ घेवून वेळेचे व पैशाची बचत करावी, असे आवाहन प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. विजय व्ही. पाटील यांनी केले. सांगली जिल्हा न्यायालयाच्या आवारात फिरत्या विधी सेवा केंद्र व लोक अदालतीच्या प्रारंभ प्रंसगी  ते बोलत होते.

दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान फिरते विधी सेवा केंद्र व लोकअदालत जिल्हयातील विविध गावामध्ये जावून कायदे विषयक जनजागृती व लोकअदालतीचे काम करणार आहे. दि. 1 वड्डी, दि. 2 विजयनगर (ता.मिरज) दि.3 कुमटे, दि. 4 बोरगांव (ता. तासगांव), दि. 6 बोरगांव, दि. 7 कोगनोळी (ता. कवठेमंहाकाळ), दि. 8 मुचंडी, दि. 9 बनाळी (ता. जत), दि. 14 दिघंची, दि.15 आटपाडी (ता. आटपाडी), दि. 16 चिंचणी मगरूळ, दि. 17 माळवणी (ता. खानापूर -विटा), दि. 18 गोगांव, दि. 20 भिलवडी (ता. पलुस), दि. 21 तडसर, दि. 22 वांगी (ता. कडेगांव), दि. 23 मांगले, दि.24 कोकरूड (ता. शिराळा), दि. 27 वाटेगांव, दि. 28 कासेगांव (ता. वाळवा), दि. 29 तुंग, दि. 30 कवलापूर (ता. मिरज) येथे कायदेविषयक शिबीरे व लोकअदालत होणार आहे.

लोकअदालतीमध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा कायदा, असुरक्षित कामगारांचे अधिकार, ग्राहक संरक्षण या कायद्यांनुसार प्रलंबित असलेले दावे व किरकोळ खटले तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

साताÚयातून आलेल्या या फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन न्यायाधीश श्री. विजय व्ही. पाटील यांनी केले. नंतर फिरत्या न्यायालयाचे वाहन वड्डीच्या दिशेने रवाना झाले.

यावेळी  न्यायाधीश श्री आर.के. मलाबादे, श्री डी.पी.सातवळेकर,  श्री आर.एन.माजगांवकर, श्री आर.व्ही.जगताप, श्री एस.पी.पोळ, एस.व्ही.पोतदार, एम.एम.पाटील, एल.डी.हुली, पी.ए.साने, पी.पी.केस्तीकर, पी.के.नरदेले, पी.ए.पत्की, आर.व्ही.पांडे, डी.आर.देशमुख,  एम.एन.चव्हाण, व्ही.व्ही.कुलकर्णी, एस.पी.केस्तीकर, एन.बी.घाटगे, ए.एम.चव्हाण, डी.एम.भांडे, ए.ए.कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील अॅड. अरविंद देशमुख, वकील संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र लांडे ,  लोक अदालत मुख्य सदस्य सेवानिवृत्त  न्यायाधीश उपाध्ये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी यांनी नियोजन केले.

Post a Comment

Previous Post Next Post