मृत्यूचा सापळा बनलेला सांगली-कोल्हापूर महामार्ग घेणार मोकळा श्वास , खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश!

 दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगली कोल्हापूर रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटी कडे हस्तांतरित ६ महिन्यांत नवीन रस्त्याचे भुमिपुजन होणार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.

आज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार मा. नितीनजी गडकरी यांचेकडे खासदार धैर्यशील माने रत्नागिरी - कोल्हापूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगली पर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे हस्तांतरण  करण्याची मागणी केली. खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ सदर रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे हस्तांतरित करीत असल्याचे जाहीर केले व पुढील सहा महिन्यांत या रस्त्याचा डीपीआर तयार करून घेऊन नवीन रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करणार असल्याचे जाहीर केले. पूर्वी सांगली कोल्हापूर या बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बनविन्यात आलेल्या या रस्त्यावर यापूर्वी खर्च केलेली सर्व रक्कम राज्य शासन देणार असून हा रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे वर्ग झाल्यामुळे  मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याने खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नामुळे मोकळा श्वास घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post