दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
झटपट नफ्याचे आमिष आणि लाखोंची गुंतवणूक
याप्रकरणातील फिर्यादी भास्कर मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे याच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा मिळवण्यासाठी माझ्याकडे एक स्कीम असल्याचे त्यांना सांगितले. यात 10 हजार इतक्या कमी दराने सोनं मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. अशाच आणखी काही लोकांना देखील झटपट नफा मिळेल असे सांगत पैसे गुंतवण्यास सांगितले आणि काही लोकांनी लाखोंनी पैसे गुंतवले.
आधी विश्वास संपादन मग फसवणूक
फिर्यादी भास्कर मुळीक यांनी सुरुवातीला कोकणेंकडे 3 तोळ्याची रोख दिली. कोकणेने या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी मुळीक यांना तीन तोळे सोने आणि या सोन्याची अधिकृत पावती देखील दिली. कमी दरात सोने मिळतंय याची खात्री पटल्याने मुळीक यांनी कोकणेंला पुन्हा काही रक्कम दिली. यावेळी कोकणेने दोन दिवसात सोने आणून देतो असे सांगितले मात्र ते दिलेच नाहीत. मुळीक जेव्हा कोकणेच्या घरी गेली त्यावेळी तिथे कुणी नसल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे मुळीक यांच्या लक्षात आले. मुळीक यांच्याबरोबर आणखी काही लोकांनी कोकणेला झटपट नफ्याच्या अमिषापोटी आणि कमी दरात सोने मिळतेय या आमिषाने कुणी 8 लाख, कुणी 5 लाख तर कुणी 10 -14 लाख इतकी मोठी रक्कम दिली. यामुळे कोकणे दाम्पत्याने केलेल्या फसवणुकीचा आकडा हा 53 लाखाच्या जवळ गेलाय.