दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
सांगली : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारद बंदला पाठिंबा म्हणून सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात आज धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी आणि केंद्रीय श्रम संहीता कायदा मंजुर केला आहे.कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला एक वर्ष पुर्ण झाले, परंतु अजुनही सरकारने शेतकरी नेत्यांच्याबरोबर चर्चा करुन मार्ग काढण्याची भूमिका घेतलेली नाही.
म्हणुन संय़ुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आंदोलन झाले. आदोलनात उमेश देशमुख, महेश खराडे, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, डॉ. माधुरी देशमुख, जानार्धन गोधळी, तुळशीराम गळवे, रेहाना शेख, शोभा कोल्हे आदी सहभागी झाले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आम आदमी पक्षाचे राजकुमार राठोड, आशपाक शेख यांनी आंदोलनात सहभागी होउन पाठिंबा दिला. सेवा दलाचे सदाशिव मगदुम आणी त्यांच्या टीमने क्रांतीगिते गायली.