सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन.

 सांगली : ऊस वाहतूकदारांच्या अनेक समस्या आहेत, मात्र ते संघटित नाहीत. त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी गुरुवारी (ता. ३०) सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.


मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी बारा वाजता मार्केट यार्डातील सहकार भवनात मेळावा होणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी मजूर कोट्यवधीचा गंडा घालतात. यामुळे गेल्या काही वर्षांत तब्बल २०० वाहतूकदारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे तोडणी मजुरांसाठी दिल्या जाणाऱ्या उच्चलींना विमा संरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी आहे.

पोलिस व आरटीओकडून होणारी लूट थांबली पाहिजे. अलीकडच्या काळात ट्रॅफिक व ओव्हरलोडच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतो. तो थांबला पाहिजे. ऊस वाहतूक महामंडळाची स्थापना केली पाहिजे. या महामंडळाकडे मजुराची नोंदणी झाली पाहिजे. नोंदणीकृत मजुरांचा पुरवठा साखर कारखान्यांना झाला पाहिजे. टोल माफी मिळाली पाहिजे. साखर कारखान्यांनी वाहतुकीचे पैसे त्वरित दिले पाहिजेत. कमिशनसाठी ही अडवणूक होता कामा नये. यासह अन्य मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून

Post a Comment

Previous Post Next Post