खुरपे ट्रेडर्स मजरेवाडी यांचा असाही विश्वास संपादन....... दुकानात विसरून गेलेले सोने व रोखड रक्कम दिले परतदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मजरेवाडी...  तालुका शिरोळ :

      अल्पावधीतच आपल्या दुकानात  गुणात्मक दर्जेदार व माफक दरात वस्तू उपलब्ध करून ग्राहक हेच आमचे दैवत मानून पंचक्रोशीत नाव कमावलेले वर्धमान व बंडू उर्फ प्रदिप खुरपे या भावंडांचे खुरपे ट्रेडर्स मजरेवाडी या नावाने प्रसिद्धीस आले आहे..

       नेहमी प्रमाणे एक जोडपे दुकानात आले व त्यांना हवे ते माल खरेदी करून त्याचे बील ही रोखीने दिले.व आलेल्या कारने आपल्या गावी पोहोचले...

  गावी पोहोचले नंतर त्या जोडप्याच्या लक्षात आलं की आपण आपले पर्स खुरपे ट्रेडर्स येथे विसरलोय.लागलीच त्यांनी खुरपे ना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा नंबर नसल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगितले की, आम्ही गडबडीत दुकानात पर्स विसरून आलो आहे.तिथ दुकानात जाऊन पर्स आहे का? चौकशी करून फोन करण्यास सांगितले.त्याप्रमाणे त्या  इसमाचे आई खुरपे ट्रेडर्स येथे आल्यावर त्यांनी विसरून राहीलेले पर्स आहे का चौकशी केली.दुकानदारानी पर्स असलेची सांगितले त्यावर त्या आई हिरमुसल्या व मुलाला फोन करून  पर्स असलेची सांगितले......त्यावर थोड्या वेळाने ते जोडपे आपल्या चार चाकी गाडीने दुकानात आले खुरपे भावंडांचे पाया पडु लागले.खुरपेही भारावून गेले व पहिल्यादा त्यांना पिण्यास पाणी व धीर देत विचारले  काय झालं...

   तर त्या जोडप्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर होऊन बोलू लागले की या पर्स मध्ये १६ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रक्कम आहे.छनाचाही विलंब न करता खुरपेनी  त्यांचा पर्स त्यांना दिले व आपले वस्तू रक्कम बरोबर आहे का पाहण्यास सांगितले.जोडप्यानी त्यातील रक्कम काढून बाक्षीस म्हणून देत होते मात्र दोन्ही भावंडांनी ती नाकारून आपले ग्राहक हेच आमचे दैवत आहे व ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास हाच आमचा बाक्षीस आहे असे म्हणत खुरपे भावंडांनी त्यांना धिर देत त्यांचे बाक्षीस नाकारले...

यामुळे पुन्हा एकदा खुरपे ट्रेडर्स मजरेवाडी चे चालक वर्धमान व बंडू उर्फ प्रदिप खुरपे यांचे प्रामाणिक पणाबद्दल मजरेवाडी परिसरातुन  कौतुक होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post