विधायक कामासाठी श्री दत्त उद्योग समूह नेहमीच पुढाकार घेईल दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

शिरोळ 

 कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वार्षिक शुल्कामध्ये सवलत दिली जाईल. तसेच आगामी काळात रोटरीच्या सहकार्याने कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी मोठे शिबीर आयोजित करून त्याचा फायदा रुग्णांना होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  अशा विधायक कामासाठी दत्त उद्योग समूह नेहमीच पुढाकार घेईल, अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

      डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती, अभियंता दिनानिमित्त शिरोळ येथील रोटरी क्लब, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स हॉस्पिटल सांगली आणि श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आणि अभियंत्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम श्री दत्त पॉलिटेक्निक मध्ये आयोजित करण्यात आला होता. दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी रोटरीचे प्रेसिडेंट दीपक ढवळे यांनी प्रास्ताविक करून रोटरीच्या कामाची माहिती दिली. दत्त पॉलिटेक्निकचे डायरेक्टर अंबादास नानिवडेकर, डॉ. सुहास जोशी, मल्लिकार्जुन बडे, रुस्तम मुजावर, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त करून रोटरीच्या माध्यमातून होत असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. आभार सचिन देशमुख यांनी मानले. यावेळी उद्योगपती अशोक कोळेकर, नगरसेवक विठ्ठल पाटील, संजय गावडे, प्राचार्य प्रेमसागर पाटील, उपप्राचार्य निळकंठ भोळे, धैर्यशील पाटील, रोटरीचे सर्व सदस्य,  कॉलेजच्या सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शक्तीजीत गुरव, शंकर कांबळे, दत्त उद्योग समूहातील विविध विभागप्रमुख व कर्मचारी व स्व. सा. रे. पाटील फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post