रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने भिवंडी- ठाणे रस्त्यावरील टोल नाक्याची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

ठाणे - भिवंडी- ठाणे रस्त्यावरील टोल नाक्याची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कशेळी टोल नाक्यावर हा प्रकार घडला असून ही तोडफोड रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने करण्यात आली आहे.तोडफोडीचा व्हिडिओ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी मनसे कार्यकर्त्यांनी भिवंडी- ठाणे रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल नाक्याची तोडफोड करण्यात येईल, अशा इशारा दिला होता. मात्र तरीसुद्धा या रस्त्यावरी खड्डे बुजविण्यात आले न आल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली आहे.

मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह भिवंडी - ठाणे रोडवरील कशेळी टोल नाका फोडून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी बॅट आणि लाकडी दांडक्याच्या साह्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं आहे.मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या या हल्ल्यात टोलनाक्याचं बरंच नुकसान झालं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post