मुरगूड : येथील माधवनगर वसाहतीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला, चाकू हल्ला करणारा संशयित आरोपी सचिन दिनकर मुरगुडेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुरगूड : येथील माधवनगर वसाहतीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून कोल्हापूरमधील शासकीय रुग्णालयात तिघांवरही उपचार सुरू आहेत.चाकू हल्ला करणारा संशयित आरोपी सचिन दिनकर मुरगुडे (वय ४०) याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्यात शंकर ईश्वरा गिरी (वय ३८) त्यांची पत्नी मेघा शंकर गिरी (३३) व आई शांताबाई ईश्वरा गिरी (६०) हे तिघे गंभीर जखमी आहेत. दरम्यान, शांताबाई यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, हल्लेखोर सचिन मुरगुडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सचिन मुरगुडे आणि शंकर गिरी हे दोघे ही येथील माधवनगर वसाहतीमध्ये एकाच गल्ली त राहतात. दोघांच्यात गेले अनेक दिवसांपासून वाद आहे. त्यातून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास माधवनगरमधील महादेव मंदिराच्या परिसरात मुरगुडे व गिरी यांच्यात भांडण झाले. त्यातून मुरगुडे यांनी चाकूने गिरी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या गिरी यांच्या आई व पत्नी यांच्यावरही वार झाले.

Post a Comment

Previous Post Next Post