जयसिंगपूर शहर मनसेच्या वतीने न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन.





दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मनसे जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिसे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भटक्या व  मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना व लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत,तसेच पहाटे व सायंकाळी फिरायला जाणारे जेष्ठ नागरिक, महिला व अंगणात खेळणारे लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे,मात्र या बाबींकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून  या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा असे निवेदन जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी यांना देण्यात आले. 

येत्या चार दिवसात यावर अमलबजावणी न झाल्यास ही कुत्री कुठलीही पूर्व सूचना न देता पालिका प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दालनात आणून सोडून मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देऊन माहितीसाठी प्रत म्हणून मा.नगराध्यक्षा,मा.उपनगराध्यक्ष, पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले.

         यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे,जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष सचिन चकोते,उपाध्यक्ष अमित पाटील,उपाध्यक्ष राजेश कर्णाळे,माजी तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,सहकार सेनेचे शहराध्यक्ष महेश पोरे,सोशल मीडिया शहरध्यक्ष अवधूत तांदळे,वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष किरण चव्हाण,धरणगुत्ती सो. मीडिया अध्यक्ष रोहित जाधव आदी महाराष्ट्र सैनिक,पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post