Posts

Showing posts from October, 2021

शिरवळ येथे कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आंतर जिल्हा सराईत टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   खंडाळा |  शिरवळ येथे कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आंतर जिल्हा सराईत टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील सर्व संशयित एक महिन्यापासून फरार होते. संशयित तिघांकडून आठ गुन्हे उघड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मनोज संदीपान शिंदे (वय- 42, रा. बोराटवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), अजय संजय आढाव (वय- 21), सचिन प्रकाश जाधव (वय- 28, दोघेही, रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयिताने पीडित मुलीला पळवून नेण्यासाठी आपल्या साथीदारांसमवेत येऊन पीडितेला तिच्या घरात शिरून घरातील लोकांना कोयत्याचा धाक दाखवून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. शिरवळ पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन अटक केली आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलिस निरीक्षक, राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहायक फौजदार पांडुरंग हजारे, जितें

हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन...?

Image
  कोल्हापूर शहर युवासेनेच्या वतीने  रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर: सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना "अच्चे दिन" दाखविण्याचे वचन दिले होते. पण, निवडणुकीनंतर "चुनावी जुमला" म्हणत तमाम भारत वासियांना महागाईच्या खाईत ढकलले. देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना, पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे चालू आहेत. हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन? असा सवाल करीत रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथून या रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "युवासेना जिंदाबाद", "पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेबांचा विजय असो" "पेट्

आर.सी. गँगच्या १० जणांवर जिल्हा पोलिस दलाने मोकाअंतर्गत कारवाई

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर :  खून, दरोडा , मारामाऱ्या असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आर.सी. गँगच्या १० जणांवर जिल्हा पोलिस दलाने मोकाअंतर्गत कारवाई केली. रवी सुरेश शिंदे, प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेद इब्राहीम सैय्यद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील आणि विकी माटुंगे अशी त्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर. सी. गँगवर वर्चस्व प्रस्तापित करण्यास खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, बदला घेणे, गंभीर दुखापत, प्राणघातक शस्त्र तस्करी, गर्दी जमवून मारामारी असे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र ३७ तर ८ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, २२ सप्टेंबर सायंकाळी भास्कर डॉन गँगचा प्रमुख अमोल भास्कर याच्या मोटारीचा पाठलाग करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आर.सी. गँगच्या संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या संघटित गुन्हेगारीची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार प

शिवसेना कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत 'जाहिर मेळावा'

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  शिवसेना शाहुवाडी- पन्हाळा तालुका मा. उदयजी सामंत    ( उच्च व तंत्रशिक्षणमंत्री) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत 'जाहिर मेळावा'     उपस्थित शिवसेना खासदार मा. धैर्यशिल माने(दादा) शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा गोकुळ संचालक मा.मुरलीधर जाधव, मा. आम.सत्यजीत पाटील (आबा), शाहूवाडी-पन्हाळा संपर्क प्रमुख आनंद भेडसे, उपजिल्हाप्रमुख मा.नामदेव गीरी, जि.प.सदस्य व मा.आरोग्य व बांधकाम सभापती हंबीराव पाटील,पं.स.मा.सभापती विजय खोत,शाहुवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार,पन्हाळा तालुका प्रमुख बाबा पाटील,नुतन पं.स.सभापती लतादेवी पाटील,उपसभापती पांडूरंग पाटील, जि.प.स.डॉ. स्नेहा जाधव, महिला उपजिल्हा संघटीका दिप्ती कोळेकर,तालुका संघटीका अलका भालेकर,उपतालुकाप्रमुख विजय लाटकर शिवसैनिक,युवा सैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र मध्ये सात कोटींचे अमली पदार्थ जप्त , 45 आरोपींना बेड्या ठोकल्या

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : नाशिकः  गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणी एकूण 171 आरोपींना तुरुंगाची हवा खायला पाठवले आहे. सध्या आर्यन खान प्रकरणामुळे ड्रग्ज तस्करीची जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक विभागात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मालेगावमध्ये सापडले. हे प्रकरणही जिल्ह्यात बरेच गाजले. आता उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या दीड महिन्यात ड्रग्ज तस्करांवर धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात उत्तर महाराष्ट्रात आठ ठिकाणी गांजाची शेती नष्ट केली. विशेषतः नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात चोरून गांजाची शेती करणे सुरू होते. त्यात नंदुरबारमध्ये तर वनविभागाच्या जागेवर कब्जा करून हे उद्योग सुरू होते. येणाऱ्या काळात नाशिक, धुळे, नगर, नंदुरब

कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विना चिठ्ठी सरळ आपल्या भेटीसाठी सर्वसामान्यांना परवानगी देऊन एक चांगला निर्णय घेतला.

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर : जिल्हाधिकारी म्हटल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भीतीचे वातावरण असते .पण  सर्वसामान्यांच्या मनातील ही भीती  कमी करत कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विना चिठ्ठी  सरळ आपल्या भेटीसाठी सर्वसामान्यांना परवानगी देऊन एक चांगला निर्णय घेतल्यामुळे 'आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन' व 'आम्ही कोल्हापुरी साप्ताहिक' परिवाराच्या वतीने शुक्रवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांची भेट घेऊन  त्यांचा  मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.       यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी शरद काटकर यांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचे अध्यक्ष भारत धोंगडे यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त गटविकास अधिकारी गणेश सावंत , सामाजिक कार्यकर्ते रमेश कामत , न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सेवानिवृत्त शाखाधिकारी अरुण घाटगे, दैनिक पुढारीचे पत्रकार भाऊसाहेब सकट आदी उपस्थित होते.

किरण गोसावी विरोधात आणखी चार तक्रारी पुणे पोलिसांकडे

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : पुणे :  नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी नाट्यमयरित्या अटक करण्यात आलेल्या किरण गोसावी विरोधात आणखी चार तक्रारी  पुणे पोलिसांकडे आल्या आहेत. त्यांचीही नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे सांगण्यात आले आहे. एनसीबीच्या क्रुझवरील कारवाईनंतर प्रकाश झोतात आलेल्या किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) पुणे पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. या गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत चिन्मय देशमुख (वय २२) या तरुणाने २०१८ मध्ये तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत त्याला २०१९ मध्ये फरार घोषित केले होते. तर या गुन्ह्यात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. दरम्यान, एनसीबीने क्रूझ कारवाईदरम्यान पंच म्हणून नेले होते. त्यानंतर त्याने एक सेल्फी आर्यन खान सोबत काढली. त्यानंतर तो चर्चेत आला होता. दरम्यान, पूर्वीपासून पुणे पोलिसांचा फरार आरोपो असलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी गुरूवारी सकाळी कात्रज भागातून अटक केली. त्याला न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस

कवठेगुलंदचे सुपुत्र व महाराष्ट्र सैनिक "श्री.संतोष केटकाळे" यांची 'शिरोळ तालुका उपाध्यक्ष' पदी निवड .

Image
 सार्थ निवड..... दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष मा.जयराज (दादा) लांडगे यांच्या सूचनेनुसार व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.गजाननराव (आण्णा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेगुलंदचे सुपुत्र व महाराष्ट्र सैनिक "श्री.संतोष केटकाळे" यांची 'शिरोळ तालुका उपाध्यक्ष' पदी निवड करण्यात आली.* निवड पत्र पक्षाचे 'राजगड' मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय,जयसिंगपूर येथे कोल्हापूर जिल्हा सचिव मा.यतीनजी होराने व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.भगवंत जांभळे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी वाहतूक सेना कोल्हापूर जिल्हा संघटक मा.संजय (आबा) भंडारे,शिरोळ तालुकाध्यक्ष मा.कुमार पुदाले,जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश उर्फ लखन भिसे,कामगार सेनेचे जयसिंगपूर श्रीम इले.युनिट अध्यक्ष मा.विशाल ठोमके,अर्जुनवाडचे पोलीस पाटील मा.सचिन कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते मा.निखिल जगताप आदी उपस्थित होते.

हद्दवाढीच्या प्रश्‍नावर शिंदे कोणती ठोस भूमिका घेणार, या कडे शहरवासीयांचे लक्ष..

Image
गांधीनगर सारखी व्यापारी पेठ आणि एमआयडीसीचा हद्दवाढीत समावेश होणे आवश्‍यक  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  कोल्हापूर :  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जानेवारीत कोल्हापूर दौऱ्यावर आले आणि त्यांनी हद्दवाढीवर भाष्य केले. हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने पाठवून द्या, अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली. त्यानुसार प्रशासनाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. आता शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हद्दवाढीच्या प्रश्‍नावर शिंदे कोणती ठोस भूमिका घेणार, या कडे शहरवासीयांचे लक्ष आहे. अठरा गावे तसेच दोन एमआयडीसी असा २० गावांचा प्रस्ताव नगरविकास विभागाला नव्याने सादर करण्यात आला. गेल्या दहा महिन्यांपासून या प्रस्तावावर नुसतीच चर्चा सुरू आहे. तोपर्यंत बहुसदस्यीय रचनेनुसार महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी सहा महिने हद्दवाढीची घोषणा करता येत नाही. हद्दवाढ कृती समितीने प्रसंगी निवडणूक पुढे ढकला; पण हद्दवाढ करा, अशी आग्रही मागणी केली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हद्दवाढीसाठी आग्रही आहेत. आमदार च

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...नवाब मलिक

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मुंबई: ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक सूचक टि्वट केलं आहे, तसंच प्रतिक्रियाही दिली आहे. "आर्यन खानला आज जामीन मिळाला. यापूर्वी कोर्टाने दोन जणांना जामीन दिला होता" असे नवाब मलिक म्हणाले. "लोक जास्त काळ तुरुंगात राहावे, त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी यासाठी NCB नेहमी प्रयत्न करत असते. ज्या अधिकाऱ्याने या मुलांना तुरुंगात टाकलं, आज तोच राज्य सरकारने कारवाई करु नये, म्हणून कोर्टात गेला" असे मलिक म्हणाले. जेल मध्ये टाकणारा आता जेल मध्ये जायला घाबरत आहे? त्यांचा फर्जीवाडा आता समोर येत आहे. ज्या पोलिसांकडून सुरक्षा मागितली त्यांचीच भीती वाटतेय" असे नवाब मलिक म्हणाले.

आर्यन खानला अखेर जामीन आज मिळाला , आजची रात्र आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन आज मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत उद्या येणार असल्याने आजची रात्र आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे.म्हणून आता आर्यन खान उद्या अर्थात 26 दिवसानंतर तुरुंगाबाहेर येणार आहे. हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने अनेक प्रयत्न केले असून त्यासाठी आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणी देखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढं वाढलच नसतं असही वकिलांनी कोर्टाला सांगितलं. आर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला महापालिका निवडणूक लढवणार ...

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : अकोला:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये   राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांमध्ये   वारंवार दौरे करत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता मनसेनं मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला महापालिका निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती मनसेचे विठ्ठल लोखंडकर यांनी दिली आहे. मनसे अकोला महापालिका स्वबळावर लढवणार अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्ररित्या लढणार आहे. त्यासाठी पक्षस्तरावर तयारी सुरू झाली असून अकोला महानगराचा सर्वांगीण विकासाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून निवडणुकांना सामोरं जाणार असून मनसे एक भक्कम पर्याय देणार असल्याचे माहिती मनसेचे अकोला निरीक्षक विठ्ठल लोखंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकोल्यातील सर्व निवडणुकांमध्ये मनसे ताकदीनं लढणार मनसेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना लोखंडकार म्हणाले की , जिल्ह्यातील नगर परिषदा ,

नवाब मलिक यांच्या विरोधात गु्न्हा दाखल .

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    नवी दिल्ली :  नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता मलिक यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असून समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय महिला आयोगाकडं धाव.. File pic एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं असून आपल्या संविधानिक हक्कांचं संरक्षण व्हावं अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर देखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. मलिकां विरोधात एफआयआर - क्रांती रेडकर दरम्यान, समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनेही नवाब मलिक यांच्यावर एफआय़आर दाखल केल्याची माहिती दिली होती. तिनं म्हटलं की, "आमचे खासगी फोटो शेअर करुन नवाब मलिक आपल्या संविधानिक शपथेच्या विरोधात वागत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांच्याविरोधात आम्ही एफआयआर दाखल केली आहे. सध्

समीर वानखेडे जन्माने मुस्लिम...(?). SC प्रवर्गावर मिळवलेली नोकरी काढून घ्यावी.:- डॉ. राजन माकणीकर

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मुंबई दि (प्रतिनिधी) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे जन्माने मुसलमान असल्याचे दिसून आले असल्याने त्यांनी शासनाची दिशाभूल करून मिळवलेली नोकरी काढून घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे. समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून NCB ची नोकरी मिळवली असल्याचे समजत असून याप्रकरणी अनुसूचित आयोगाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तक्रार दाखल करणार आहे. गुरुवार 7 दिसेम्बर 2006 रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे  आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिमेला झाला असून काजी मुजजमिल अहेमद यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांचा निकाह लावल्याचे कबुल केले आहे. मात्र; तत्पूर्वी जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत समीर वानखेडे यांना नोकरीतून कमी करून नजर कैदेत ठेवण्यात यावे म्हणजे चौकशी करिता सोपं होईल.

शिंगणापूर बंधारा दुरुस्तीमुळे कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : शिंगणापूर बंधारा दुरुस्तीमुळे कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा मंगळवारी विस्कळीत झाला. शहराच्या बहुतांश भागात पाणी न आल्याने टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होती शिंगणापूर बंधारा दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी दोन वाजता पूर्ण झाले. बंधारा दुरुस्ती पूर्ण होताच धरणातून तत्काळ पाणी सोडण्यात आले. त्यामुळे बुधवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शिंगणापूर बंधार्‍याच्या लोखंडी प्लेट खराब झाल्याने गेली दहा वर्षे या बंधार्‍यास मोठ्या प्रमाणात गळती होती. गळतीमुळे नदीत पाणी असूनही पाणी उपसा करताना अडचणी येत होत्या. तर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा प्रकार सुरू होता. एप्रिलमध्ये महापालिकेने बंधारा दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, त्यावेळी पूर्ण दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा रविवारपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत पाणी पातळी कायम असल्याने पाणी उपसा करून रविवार आणि सोमवार दोन दिवस शहरात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा सुरू होता. शिंगणापूर बंधारा दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली. मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच्या सर्

बिरोबा व महालिंगराया, या गुरु-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दिपावाली पाडव्याच्या पूर्वसंध्येला अमावस्या दिवशी दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होणार

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    महाराष्ट्रातील जागृत, श्री हालमत संप्रदायातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून हुलजंती (ता. मंगळवेढा) महालिंगरायाची सर्वदूर ख्याती आहे. बिरोबा व महालिंगराया यांची भेट सोहळा हा प्रसिद्ध आहे. दोन वर्षाच्या कोरोना कालावधीत सव्वातीनशे वर्षाची परंपरा खंडित पडली होती. यावर्षी हन्नूरचा बिरोबा (गुरू) व महालिंगराया या गुरु-शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे, अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र-आंध्र प्रदेश, कर्नाटकातील भक्तगण आनंदित आहेत. हा दिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ असा लाखों भक्तगणांना अनुभवता येणार आहे. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली आहे. त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पाडत असतो. बिरोबा व महालिंगराया, या गुरु-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दिपावाली पाडव्याच्या पूर्वसंध्येला अमावस्या दिवशी दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता मुंडास बांधले जाते. मध्यान रात्री कैलासमधून शंकर-पार्वती पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर

हालसिद्धनाथ यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता

Image
कडक पोलिस बंदोबस्त : पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोगनोळी, ता. 25 : कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरण संपन्न झाली. मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार तारीख 21 रोजी सकाळी कुरली येथील हालसिद्धनाथ मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत आरती व विविध धार्मिक कार्यक्रमा झाले. पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आणण्यात आली. या ठिकाणी कुरली आप्पाचीवाडी पालखी अश्व छत्री प्रमुख मार्गावरून खडक मंदिराजवळ आल्यावर मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी ढोल जागर वालंग झाला. हेडम खेळवण्यात आले. मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली. रोज रात्री वालंग ढोल जागर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली.शनिवारी पहाटे भगवान ढोणे यांची पहिली भाकणूक झाली. रविवारी पहाटे या यात्रेची मुख्य भाकणूक संपन्न झाली. प्रशासनाने यात्रा रद्द म्हणून सांगितले असल्याकारणाने य

एनसीबी'चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची 'एनसीबी'च्या दक्षता विभागा मार्फत चौकशी करण्यात येणार ..

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   मुंबई :  आर्यन खान प्रकरणात 'एनसीबी'चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची 'एनसीबी'च्या दक्षता विभागा मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांना बेदखल करण्याची वानखेडे आणि एनसीबी यांची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी एनसीबीकडून दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी एनसीबीचे पथक आज, मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती, त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होते, असा आरोप साईल यांनी केला आहे. 'एनसीबी'च्या गुन्ह्य़ासंदर्भातील साक्षीदार प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र आपण पुढील कार्यवाहीसाठी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत असल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी रविवारी स्पष्ट केले हो

एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ , मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मुंबई :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  एसटीच्या  तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज (25 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. तिकीट दरात तब्बल 17 टक्‍क्‍यांची वाढ गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ वाढ झाली. इंधन महागल्यामुळे आर्थिक गणितं जुळवताना एसटी महामंडळाची दमछाक होत होती. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दीपावली हा सण साजरा करण्यासाठी चाकरमाने शहरातून आपापल्या गावी जातात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असतानाही एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचा डोलारा सांभाळण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय एसटीची यापुर्वीची भाडेवाढ जून 2018 मध्ये झाली होती. दरवाढीनंतर गेल्या दोन वर्षात डिझेलच्या दरात 25 रुपये वाढ झालीय. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा सांभाळण्यासाठी भाडेवाढीच

सॅम डिसूझाचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात , याची चौकशी करावी.... संजय राऊत

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मुंबई :  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केले होते. साईलने आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने केला होता. यावेळी त्याने सॅम या व्यक्तीचे नाव घेतले होते. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'भाजपाचे नेते जे ईडीचा खेळ करत आहे ना त्यांनी या प्रकरणातसुद्धा मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. मी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाजूला बसलेली आहे ती सॅम डिसूझा आहे. तो मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सर्वात मोठा खेळाडू आहे. तो मोठे राजकारणी, नेते, अधिकारी सर्वाचे मनी लॉन्ड्रिंग करतो असे म्हटले जाते. तो तिथे का बसला आहे? हा मोठा खेळ आहे,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 'जो साक्षीदार आहे त्याला काहीही होऊ देणार

कोल्हापूर जिल्ह्यात शूटिंग पुन्हा बहरले , सहा मालिकांचे शूटिंग एकाच वेळी सुरू राहणार

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   कोल्हापूर : चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या जिल्ह्यात आता शूटिंग पुन्हा बहरले असून, तब्बल सहा मालिकांचे शूटिंग एकाच वेळी सुरू राहणार आहे. चित्रनगरीसह जिल्ह्याच्या विविध भागांत एकाच वेळी सध्या पाच मालिकांचे शूटिंग सुरू असून, नोव्हेंबरमध्ये आणखी एक नवी मराठी मालिका येथे येणार आहे. एकाच वेळी सहा मालिकांचे शूटिंग होण्याची ही पहिलीच वेळ असेल. एकूणच मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक असणाऱ्या टीव्ही इंडस्ट्रीला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर येथील विविध लोकेशनची भुरळ पडली आहे. साहजिकच दोन वर्षांनंतर स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कोरोनापूर्वी शहर आणि परिसरात केवळ दोनच मालिकांचे शूटिंग सुरू होते; पण गेल्या दीड वर्षाचा विचार करता या दोन्ही मालिका बंद झाल्या. दुसऱ्या लॉकडाउनपूर्वी 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिका सुरू झाली; पण पुढे लॉकडाउनमुळे तीही बंदच झाली. पहिल्या लॉकडाउननंतर मुंबई, पुण्यातील शूटिंग प्रोजेक्ट कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यातून एक हिंदी आणि दोन मराठी मालिकांचे शूटिंग येथे सुरू

केंद्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   कोल्हापूर -  केंद्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तोडपाणी करण्यासाठी धाडी टाकल्या जातात की काय ही शंका आहे. या पद्धतीने जाणीवपूर्वक धाड सत्रातील इवेंट केला जातो. तोडपाणीसारख्या प्रकाराला शंका घ्यायला वाव मिळतो, अशाने तपास यंत्रणांची विश्वासार्हता शिल्लक राहणार नाही. एखादा दोषी आहे, हे न्यायलया सामोर सिद्ध न करता केवळ प्रसिद्धीसाठी धाड प्रकिया सुरु आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते. ते म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना कोरोना लस विकत घ्यायला भाग पाडले. कोरोना लसींची किंमत वाढवली ही मोदी सरकारची अक्ष्यम चूक आहे. केंद्र सरकारने लस विकत घेऊन ती राज्यांना विकत दिली असती तरी चालले असते. कोविड लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मोदी सरकराने ही जाहिरातबाजी थांबवावी असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. ते म्हणाले, जगातील प्रत्येक देशाने कोविड लस मोफत दिली. परंतु कुठेही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रध्यक्षांचा फोटो छापला नाही. मोफत लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आह

खासगी बस व्यावसायिकांनीही तिकिटाचे दरात केली विक्रमी भाव वाढ

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   नागपूर :  डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट  बिघडलेले असताना आता खासगी बस व्यावसायिकांनीही  तिकिटाचे दरात विक्रमी भाव वाढ केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी बसच्या तिकिटांची महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे. नागपूर ते पुण्यासाठीचे भाडे १२०० रुपयांवरून चार हजारावर गेल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना दिवाळीसाठी गावी परतण्यासाठी अधिकचा खिसा हलका करावा लागणार आहे. कारण खासगी बस व्यावसायिकांनी तिकिटाचे दरात विक्रमी भाव केलेली आहे. नागपूरवरुन पुण्याला आणि पुण्यावरून नागपूरला येण्यासाठी पूर्वी एक हजार ते ११०० रुपये मोजावे लागत होते ते आता चार हजार रुपयावर गेले आहे. खासगी बसने नागपूर - पुणे-औरंगाबाद, जालना, कोल्हापूरसह इतर ठिकाणच्या प्रवासासाठी प्रत्येकी अडीच ते चार हजार रुपये मोजावे लागणार आहे. विमानाचे आणि बसचे भाडे एकच झाले आहे. पुणे येथील विमानतळाचे काम सुरू असल्याने विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे विमानाचे उड

औद्योगिक क्षेत्रातील ७० टक्के कंपन्या कामगारांना दिवाळी बोनस देणार

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    कोल्हापूर :  कोरोना मुळे उत्पादन प्रक्रिया, बाजारपेठेतील मालाचा उठाव थंडावला होता. यात औद्योगिक अर्थकारणावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीतही औद्योगिक क्षेत्रातील ७० टक्के कंपन्या कामगारांना दिवाळी बोनस देणार आहेत.जिल्ह्यातील चार औद्योगिक वसाहतींत दोन हजारांवर लहानमोठ्या कंपन्या आहेत. जवळपास ८० हजारांवर कामगार आहेत. यांतील जवळपास २० हजारांवर कामगार परप्रांतीय, तर उर्वरित स्थानिक आहेत. दरवर्षी दिवाळीला बोनस देण्यात येतो. काही ठिकाणी एक वेतन, तर काही ठिकाणी निम्मे वेतन देण्यात येते. शासनाच्या आदेशानुसार किमान ८.३३ टक्के बोनस द्यावा लागतो. गेल्या पावणेदोन वर्षात कोरोनामुळे दीर्घकाळ लॉकडाउन होता. परदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाची आयात थांबली तशी उत्पादित मालाची निर्यातही मंदावली. यात अपवाद वगळून बहुतेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी खाली आली. अशा स्थितीत बहुतांशी कंपन्या कामगार कपात करण्याचा किंवा खर्चाची बचत करण्याचा मार्ग अवलंबत आहेत. कोरोना काळात निम्म्याहून अधिक कंपन्यांत कामगारांना पन्नास टक्के वेतन देण्यात येत होते; पण आपल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा रद्द.

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्षांचे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्याने या मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. काही अपरिहार्य कारणामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले आहे. मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते.

ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   नवी दिल्ली:  केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्व नोकरदारांनाही दिवाळीची भेट द्यायचे ठरवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व खातेधारक त्यांच्या खात्यात किती पीएफ पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत. आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळाले नाहीत पण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, व्याजाची रक्कम विभागनिहाय जमा केल्यामुळे अजून सर्वांच्या खात्यात पैसा जमा झालेले नाहीत. 7 वर्षांच्या कमी स्तरावरचा व्याजदर कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 8.5 टक्के दराने ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतील. गेल्या वर्षी 2019-20 या आर्थिक वर्षात केवायसीच्या गडबडीमुळे बर्‍याच ग्राहकांन

आज पासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु होणार ...

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : आज पासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह  सुरु होणार आहेत. दरम्यान आजपासूनच अम्युझमेंट पार्कही खुली करण्यात येणार आहेत.   राज्यात   कोरोनाचा प्रादुर्भाव   कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून म्हणजेच, 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले होते. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाह

समीर वानखेडेना वर्षभरात तुरंगात टाकणार..नवाब मलिक .

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एकेरी उल्लेख करत, 'तुला तुरुंगात टाकल्या शिवाय शांत राहणार नाही' असं वक्तव्य केलंय. आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना नवाब मलिक यांनी वानकेडेंवर आरोप करत एनसीबीच्या कारवाईबद्दल गंभीर आरोप केले आहेत, एनसीबी करत असलेल्या कारवाईची प्रकरणं बोगस आहेत, त्यांना आपण लवकरच एक्सपोज करू असं सांगत नवाब मलिक यांनी वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल असं गंभीर वक्तव्य मलिक यांनी केलंय. नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकताना वरून दबाव टाकणारा तुझा बाप कोण? तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी शांत राहणार नाही हे आव्हान असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हजारो कोटी रुपये वसूल करण्याचं काम केलं जातंय. हे अधिकारी आणि भाजपनेते लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांन