दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
हुपरी : आपल्या संस्कृतीत नारळ फोडणे म्हणत नाहीत..वाढविणे म्हणतात. फोडा फोडीत तुम्ही एक नंबर आहात. तुमच्या हातून चांगलं काही घडणारच नाही.
प्रथमतः तुमचं अभिनंदन...! कारण विकासकामासाठी आलेला निधी परत पाठविणारी जगातील एकमेव नगरपरिषद म्हणजे हुपरी नगरपरिषद हा सन्मान तुम्ही प्राप्त केलात.जन्मभूमीची पूजा करण्यात गैर काहीच नाही. आम्ही सर्व स्थानिक (हुपरी शहरात राहणारे) आमच्या मायभूमीची पूजा करणार आहोत.सब भूमी गोपाल की असं आम्ही मानतो.
सत्ताधारी गटाचे चौफेर काम...? हा तर फारच मोठा विनोद. तुम्ही निरक्षर आहात हेही आता सिद्ध झालंय. इमारत बांधकाम भुमीपूजन असं तुम्ही म्हणताय..तसं नाही ते...नियोजित इमारत बांधकाम जागेचा...असं आहे.
नियोजित म्हणजे इमारत अजून बांधायची आहे. आपण हुपरीकर नागरीक बांधणार आहोत.आमची प्रतिमा तर विरोधक म्हणून आहे.तुम्हाला चेहरा आहे का? शहरात तोंड दाखवायला जागा आहे का? स्वतःचं मत आहे का ?
तुमचा पक्ष कोणता? तुमच्यावर संस्कार कुठल्या पक्षाचे झालेत? आता कुठल्या पक्षात आहात? हे माहित करुन घ्या. आपलं पद अल्पायुषी आहे. कधी डच्चू मिळेल तुम्हाला कळणार पण नाही. कारण तुम्ही एवढे महत्वाचे *नाही. हे वाचताना आताच तुम्हाला घाम सुटलाय...निरोपाचा नारळ मिळणार म्हणून तुमचा हात खरोखरच थरथरतोय...अंगाचं पाणी पाणी होतंय...अंग थरथरतंय...हो ना...कामाचं बघा...नसत्या उठाठेवी बंद करा. हक्क असेल, अधिकार असेल तरच बोला.....