हनी ट्रॅपने चंदूर येथील एका यंत्रमाग कामगाराने राहत्या घरी आत्महत्या केली

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

इचलकरंजी :  हनी ट्रॅपला कंटाळून चंदूर येथील एका यंत्रमाग कामगाराने राहत्या घरी आत्महत्या केली.संतोष निकम (वय 32 रा.शाहूनगर ) असे त्याचे नाव आहे. ही आत्महत्या हनी ट्रॅपमुळे झाल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. या घटनेने हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

 सोशल मीडियावरून एक युवतीने संतोषला भुरळ घातली. त्यातून. सुरु झाले दोघांचं चॅटींग  सुरु झाले आणि दोघांचे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अश्‍लिल हावभाव सुरू झाले. युवतीने त्या हावभावाचे रेकॉर्डींग करून संतोषला धमकावत पैशाची मागणीही केली. त्यामुळे संतोषला फसवणुक झाल्याची जाणीव झाली. त्यातूनच संतोषने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (2) सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या आत्महत्येनंतर हनी ट्रॅपच्या चर्चेला उधाण आले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post