हालसिद्धनाथ यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता


कडक पोलिस बंदोबस्त : पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोगनोळी, ता. 25 : कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरण संपन्न झाली. मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवार तारीख 21 रोजी सकाळी कुरली येथील हालसिद्धनाथ मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत आरती व विविध धार्मिक कार्यक्रमा झाले. पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आणण्यात आली. या ठिकाणी कुरली आप्पाचीवाडी पालखी अश्व छत्री प्रमुख मार्गावरून खडक मंदिराजवळ आल्यावर मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी ढोल जागर वालंग झाला. हेडम खेळवण्यात आले. मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली. रोज रात्री वालंग ढोल जागर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली.शनिवारी पहाटे भगवान ढोणे यांची पहिली भाकणूक झाली. रविवारी पहाटे या यात्रेची मुख्य भाकणूक संपन्न झाली.

प्रशासनाने यात्रा रद्द म्हणून सांगितले असल्याकारणाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुकाने लावण्यात आली नव्हती.यात्रा काळात निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सलग पाच दिवस कोल्हापूर येथील प्रतिष्ठित कल्लाप्पांना पत्रावळे त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पाच दिवसांमध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी यासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

सोमवार तारीख 25 रोजी सायंकाळी आप्पाचीवाडी कुरली पालखी मंदिर प्रदिक्षणा करून वाडा मंदिराकडे व तिथून कुरली पालखी कुरली कडे रवाना झाली. कुरली येथील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक हालसिद्धनाथ मंदिरात आली. यानंतर पाच दिवस सुरू असलेल्या हालसिध्दनाथ यात्रेचे सांगता झाली.

फोटो : 

कुर्ली आप्पाचीवाडी : येथील हालसिध्दानाथ यात्रेत काढण्यात आलेली पालखी मिरवणूक (छायाचित्र : अनिल पाटील कोगनोळी)

Post a Comment

Previous Post Next Post