कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हमीदवाड येथे अनेक तरुणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन गेल्या काही दिवसांपासून मनसेत पक्ष प्रवेशाचा धडाकाच 
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना  पक्षाची ताकद वाढण्यासाठी सक्रिय झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन गेल्या काही दिवसांपासून मनसेत पक्ष प्रवेशाचा धडाकाच लागला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हमीदवाड येथे अनेक तरुणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. तसेच याठिकाणी मनसे नेते दिलीप धोत्रे  यांच्या हस्ते मनसे जनसंपर्क कार्यालय तसेच शाखेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले.

या पक्षप्रवेश सोहळ्यात कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उप जिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ, तालुका अध्यक्ष संजय पाटील, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर, विद्यार्थी सेना कार्यकारणी सदस्य वैभव माळवे, तेजस गांजले यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post