कवठेगुलंदचे सुपुत्र व महाराष्ट्र सैनिक "श्री.संतोष केटकाळे" यांची 'शिरोळ तालुका उपाध्यक्ष' पदी निवड .

 सार्थ निवड.....दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष मा.जयराज (दादा) लांडगे यांच्या सूचनेनुसार व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.गजाननराव (आण्णा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेगुलंदचे सुपुत्र व महाराष्ट्र सैनिक "श्री.संतोष केटकाळे" यांची 'शिरोळ तालुका उपाध्यक्ष' पदी निवड करण्यात आली.*

निवड पत्र पक्षाचे 'राजगड' मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय,जयसिंगपूर येथे कोल्हापूर जिल्हा सचिव मा.यतीनजी होराने व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.भगवंत जांभळे यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी वाहतूक सेना कोल्हापूर जिल्हा संघटक मा.संजय (आबा) भंडारे,शिरोळ तालुकाध्यक्ष मा.कुमार पुदाले,जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश उर्फ लखन भिसे,कामगार सेनेचे जयसिंगपूर श्रीम इले.युनिट अध्यक्ष मा.विशाल ठोमके,अर्जुनवाडचे पोलीस पाटील मा.सचिन कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते मा.निखिल जगताप आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post